- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-एकीकडे उन तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा खेळ थांबू-थांबू सुरू झाल्याचे चित्र महाराष्ट्र राज्याच्या काही भागात मागील काही दिवसांपासून पहावयास मिळत आहे.गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध भागांत पावसाच्या सरी कोसळल्या असून काही ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह गारपीट झाल्याची नोंद आहे.अश्यातच लखलखत्या उन्हामुळे नागरिक त्रस्त झालेले असतांनाच दुसरीकडे अवकाळी पावसाची चाहूल लागली आहे.हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवस राज्यातील काही भागांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार,कोकण, मध्य महाराष्ट्र,मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.यासोबतच ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, असाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडतांना काळजी घेणे आवश्यक आहे.विशेषतः दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग,कोल्हापूर,सातारा घाट परिसर,सांगली,सोलापूर तसेच मराठवाड्यातील परभणी,बीड,नांदेड, लातूर,धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ येथेही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.अवकाळी पावसामुळे आधीच उष्णतेचा सामना करणाऱ्या जनतेसमोर नवे आव्हान उभे राहिल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
- Advertisement -

