Thursday, April 30, 2026
Homeगडचिरोलीघरगुती गॅस सिलेंडरबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये- सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

घरगुती गॅस सिलेंडरबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये- सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-इराण-इस्राईल युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडरबाबत काही अफवा समाजमाध्यमांवर पसरत असल्याचे दिसून येत असून नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये,असे आवाहन जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी केले आहे.जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारची घबराट न बाळगता अनावश्यक साठेबाजी करू नये,असे स्पष्ट केले.
सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी दिलेल्या संदेशात म्हटले आहे की,जिल्ह्यातील सर्व गॅस वितरकांकडे घरगुती एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांना नियमितपणे गॅस सिलेंडरचा पुरवठा करण्यात येत आहे.त्यामुळे गॅस तुटवड्याच्या अफवा पसरविणे अथवा त्यावर विश्वास ठेवणे टाळावे.दरम्यान, जिल्हा प्रशासनाने गॅस सिलेंडरचा काळाबाजार,अवैध साठवणूक आणि गैरवापर रोखण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे.विविध तालुक्यांमध्ये विशेष पथके नियुक्त करून तपासण्या सुरू असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांच्या हितासाठी प्रशासन सतर्क असून गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये,आवश्यक तेवढाच गॅस वापरावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

नक्षलमुक्तीचा ठेवा..! स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७ वर्षात प्रथमच जिल्हाधिकारी गडचिरोलीच्या दुर्गम भागात..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या टोकावर वसलेल्या व छत्तीसगडच्या सीमेवरील अत्यंत दुर्गम व नक्षल प्रभावित भामरागड तालुक्याच्या बीनागुंडा आणि लाहेरी या भागात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७...

पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘जीवनदायिनी’.. गडचिरोली जिल्ह्यात ३१ रुग्णांना तब्बल ३१ लाख ३५ हजार रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे.गडचिरोली जिल्ह्यात आर्थिक वर्षात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!