Saturday, October 17, 2026
Homeकुरखेडापूरग्रस्त महिलेची हक्काच्या प्लाट करीता पायपीट; 'शासन आपल्या दारी' उपक्रमास ठेंगा.. -कुरखेडा...

पूरग्रस्त महिलेची हक्काच्या प्लाट करीता पायपीट; ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमास ठेंगा.. -कुरखेडा महसूल विभागातील बेजबाबदार कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-एकीकडे शासन विविध सरकारी योजना,कागदपत्रे आणि सेवा एकाच ठिकाणी थेट नागरिकांच्या दारात उपलब्ध करून देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबवून प्रशासनातील अडथळे दूर करून पारदर्शक,वेगवान आणि सुलभ सेवा प्रदान करण्याचा मोठा गाजावाजा करीत आहे.मात्र,काही बेजबाबदार व कामचुकार कर्मचाऱ्यांकडून शासकीय स्तरावरून सुरू असलेल्या या उपक्रमास ठेंगा दाखविण्यात येत असल्याचा प्रकार कुरखेडा तहसील कार्यालय अंतर्गत जमीन शाखेत उघडकीस आला आहे. शहरातील एका पूरग्रस्त आदिवासी समाजातील महिलेच्या मुलाच्या नावाने उपलब्ध करून देण्यात आलेल्या प्लाटसाठी शासकीय फी जमा करीत ताबा मिळविण्याकरीता मागील एक वर्षापासून कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याने कुरखेडा महसूल विभागातील बेजबाबदार कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी कुरखेडा शिवसेना तालुका प्रमुख तथा नगरसेवक आशिष काळे यांनी केली आहे.
कुरखेडा शहराच्या सतीनदी काठावरील काही पूरग्रस्त कुटुंबांचे काही वर्षापूर्वी सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन व्हावे म्हणून त्यांना सूरक्षित असलेल्या शासकीय आबादी जागेत नाममात्र दरात प्लाट उपलब्ध करून देण्यात आले.यासाठी शासकीय रकमेचा भरणा करून अनेक लाभार्थींनी प्लाटचा ताबा घेतलेला आहे.तर काही लाभार्थी वेळेवर फी न भरू शकल्याने वा अन्य कारणाने अद्याप ताबा घेऊ शकलेले नाही.यात माया निलकंठ आलाम या आदिवासी महिलेला सुद्धा त्यांच्या मृतक मुलाच्या नावाने शासकीय प्लाट उपलब्ध करून देण्यात आला आहे.तिला प्लाटचा ताबा हवा असल्याने ती कुरखेडा येथील जमीन शाखेत मागील एक वर्षापासून चकरा मारत आहे.मात्र,येथील पदस्थ सहाय्यक महसूल अधिकारी जुमनाके प्रकरण शोधतो,प्रकरण मिळत नाही, मालमत्तेचे काम काय?अश्या बाता जोडून तिला वारंवार पायपीट करण्यास भाग पाडत आहे.अश्यातच आज, सोमवार ९ मार्च रोजी लाभार्थी माया आलाम प्रकरणा संदर्भात स्थानिक शिवसेना तालुका प्रमुख तथा नगरसेवक आशिष काळे यांना सोबत घेऊन जमीन शाखेत चौकशी केली असता,सहाय्यक महसूल अधिकारी जुमनाके यांनी मला तेच काम आहे कां? तहसीलदार यांना माहीती विचारा?असे उध्दट उत्तर दिले.त्यामुळे,अशा उद्धट व कामचुकार व ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या हेतुला हरताळ फासणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करीत कारवाई करावी व आदिवासी महिलेला न्याय देण्यात यावा,असे निवेदन आज कुरखेडा तहसीलदार यांना लाभार्थी माया आलाम यांनी दिले आहे.सदर प्रकरणाची चौकशी करीत मुजोर,कामचुकार अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास शिवसेनेच्या  वतीने आंदोलन छेडण्यात येईल,असा इशाराही याप्रसंगी नगरसेवक आशिष काळे यांनी दिला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!