Saturday, October 17, 2026
Homeगडचिरोलीआपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढून लोकन्यायालयाचा लाभ घेण्याचे आवाहन..

आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढून लोकन्यायालयाचा लाभ घेण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांच्या वतीने येत्या,शनिवार १४ मार्च २०२६ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.ही लोकअदालत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिरुद्ध टिकले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणार आहे.
जिल्हा व सत्र न्यायालय गडचिरोली व अहेरी तसेच तालुका न्यायालय अहेरी,आरमोरी,चामोर्शी,देसाईगंज, धानोरा,कुरखेडा आणि सिरोंचा येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार असून न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोडीस पात्र फौजदारी प्रकरणे,दिवाणी दावे तसेच दाखलपूर्व प्रकरणे दोन्ही पक्षकारांच्या संमतीने आपसी तडजोडीद्वारे निकाली काढण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी व फौजदारी स्वरूपातील तडजोडीस पात्र प्रकरणे,प्ली बार्गेनिंग प्रकरणे,१३८ एन.आय.ॲक्ट अंतर्गत प्रकरणे,भूसंपादन प्रकरणे,कौटुंबिक वाद,मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे,दरखास्त प्रकरणे,बँकांशी संबंधित प्रकरणे तसेच दाखलपूर्व वादांमध्ये टेलिफोन व मोबाईल कंपन्यांशी संबंधित वाद,महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीशी संबंधित प्रकरणे,पतसंस्थांशी संबंधित वाद,नगर परिषद व ग्रामपंचायत कर आकारणी प्रकरणे तसेच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचातील प्रकरणे यांचा समावेश असणार आहे.
लोकअदालतीत प्रकरणे तडजोडीसाठी ठेवतांना कोणत्याही प्रकारची न्यायालयीन फी भरावी लागत नाही.तसेच लोकअदालतीच्या निवाड्याविरुद्ध अपील करता येत नाही.लोकअदालतीत झालेला निर्णय न्यायालयाच्या हुकूमनाम्याप्रमाणे अंमलात आणता येतो.यामध्ये साक्ष-पुरावा,उलटतपासणी व दीर्घ युक्तीवादाची प्रक्रिया टाळली जात असल्याने प्रकरणांचा जलद व सोपा निपटारा होतो.शिवाय लोकअदालतीत निकाली निघालेल्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार भरलेली कोर्ट फी परत मिळण्याची तरतूद आहे.तरी येत्या,१४ मार्च २०२६ रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये पक्षकार, अधिवक्ता व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढून लोकन्यायालयाचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती अंकुश खानोरकर यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विविध शिष्यवृत्तीसाठी एनएसपी व महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नोंदणीचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील अर्ज केंद्र शासनाच्या राष्ट्रीय...

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!