Thursday, July 16, 2026
Homeगडचिरोलीसर्व यात्रा सुरक्षित संपन्न; नदीपात्रातील संभाव्य जिवितहानी टाळण्यात यश.. - चार युवकांचे...

सर्व यात्रा सुरक्षित संपन्न; नदीपात्रातील संभाव्य जिवितहानी टाळण्यात यश.. – चार युवकांचे प्राण वाचवले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्हाधिकारी अव‍िश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गडचिरोलीमार्फत महाशिवरात्री निमित्त आयोजित यात्रांमध्ये प्रभावी आपत्ती व्यवस्थापन राबविण्यात आले.मौजा-मार्कंडा(ता.चामोर्शी),मौजा-चपराळा (ता.चामोर्शी)तसेच मौजा-पळसगाव (ता.आरमोरी)येथे १५ फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या यात्रांचा कालावधी २५ फेब्रुवारी पर्यंत यशस्वीपणे पार पडला.विशेषतः मार्कंडा येथील यात्रेदरम्यान वैनगंगा नदीपात्रात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी व्यापक उपाययोजना करण्यात आल्या होत्या.राज्य आपत्ती प्रतिसाद दल(एसडीआरएफ)नागपूर येथील २० जवानांचे पथक,अग्निशमन विभाग,पोलीस विभागाचे बचाव पथक,बोट व आवश्यक बचाव साहित्य तसेच आपदा-मित्र यांचे पथक यात्रा कालावधीत तैनात करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे यांनी यात्रा पूर्वतयारीसंदर्भात वेळोवेळी बैठका घेऊन सर्व संबंधित विभागांना स्पष्ट दिशानिर्देश दिले.महसूल, पोलीस,जिल्हा परिषद व इतर संबंधित विभागांनी समन्वयाने काम करत यात्रा सुरक्षित व सुरळीत पार पाडण्यासाठी अथक प्रयत्न केले.
आपत्ती व्यवस्थापनाच्या तत्परतेमुळे नदीपात्रातील संभाव्य जिवितहानी टाळण्यात यश आले.१८ फेब्रुवारी रोजी आपदा मित्र मनोज आत्राम व एसडीआरएफ जवान जी.डी.सांगळे यांनी नदीत बुडत असलेल्या एका युवकाचे प्राण वाचविले.तसेच  २२ फेब्रुवारी रोजी तीन युवक नदीपात्रात बुडाल्याची घटना घडताच आपदा मित्र समीर शेंडे,पोलीस बचाव पथकातील बाबा वासनिक व गोपाळ आलाम यांनी तात्काळ बोट व लाईफ जॅकेटच्या सहाय्याने नदीत उतरून तिन्ही युवकांना सुरक्षित बाहेर काढले.या कालावधीत जिल्ह्यातील सर्व यात्रा सुरक्षितरित्या पार पडल्या असून कोणतीही अप्रिय घटना घडलेली नाही.जिवितहानी टाळण्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची व आपदा मित्रांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली.
सदर यात्रांचे आपत्ती व्यवस्थापन नियोजन उपविभागीय अधिकारी चामोर्शी एम.अरुण व उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तहसिलदार प्रशांत घोरुडे,गटविकास अधिकारी प्रकाश पोळ,पोलीस निरीक्षक दीपक डोंब,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे,सहाय्यक महसूल अधिकारी (आपत्ती व्यवस्थापन) स्वप्नील माटे तसेच आपदा मित्र चंद्रशेखर मोलंगुलवार, अजित नरोटे,कल्पक चौधरी व मयुर किन्नाके यांच्या सहकार्याने यात्रा आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलीस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.. – ३ लाख रुपये घेतांना रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात गुन्हा 'बी' फायनल करण्यासाठी मदत केली व पुढे भविष्यातही अशीच मदत करण्यासाठी ८ लाख रुपयांची मागणी करून...

आज २२ मिनी सेतू केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.. दुर्गम भागात लोकाभिमुख डिजिटल प्रशासनाला नवी दिशा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई/गडचिरोली :-गडचिरोलीत नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढली असून दुर्गम भागातील नागरिकांना केवळ प्रशासनाची उपस्थिती नव्हे,तर प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा...

वनहक्क पट्टेधारकांसाठी मोठा निर्णय; शेतकरी म्हणून मिळणार स्वतंत्र ओळख.. – विविध योजनांचाही मिळणार लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-वनहक्क पट्टेधारकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासींना आता सुधारित सातबारा मिळणार असल्याने...

गडचिरोली जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा; शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.. – खताची जादा दराने विक्री केल्यास करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता व घाबरून न...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!