Sunday, September 6, 2026
Homeगोंदियासात नागरिकांनी कर्ज घेऊन यंत्र खरेदी केले; यंत्र सुरूच होईना..! - शेवटी...

सात नागरिकांनी कर्ज घेऊन यंत्र खरेदी केले; यंत्र सुरूच होईना..! – शेवटी ग्राहक मंचात धाव; सात ग्राहकांना व्याजासह रक्कम परत करण्याचे आदेश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील भिवखिडकी येथील सात नागरिकांनी बँकेतून कर्ज घेऊन अगरबत्ती यंत्र खरेदी केले होते.यंत्र खरेदी केले खरी,पण सुरूच होत नसल्याने सातही नागरिकांनी जिल्हा ग्राहक मंचात धाव घेत तक्रार दाखल केली.प्रकरणी आयोगात सुनावणी पार पडली.यात गोंदिया जिल्हा ग्राहक मंचाने गुजरातच्या सुरत येथील मेसर्स कृष्णा इंजिनिअरिंग कंपनीला सात ग्राहकांना तब्बल १ लाख २९ हजार ८०० रुपये व्याजासह देण्याचे आदेश  दिले आहेत.अर्जुनी- मोरगाव तालुक्यातील भिवखिडकी येथील रहिवासी दीपाली नरेंद्र भोयर,नेहा नागेश्वर वासनिक,सविता प्रदीप वासनिक,सुनीता घनश्याम नागपुरे,ज्योती दुलीचंद गहाणे,छाया केदार गहाणे आणि नाशिका यशवंत बावणे यांनी अर्जुनी-मोरगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतून कर्ज घेऊन संयुक्तपणे अगरबत्ती यंत्र खरेदी केले होते.जिल्हा वितरक गोंदिया कटंगी येथील विनय अगरबत्ती सेंटरने हे यंत्र पुरवले होते.या यंत्रांची उत्पादक कंपनी सुरत येथील मेसर्स कृष्णा इंजिनिअरिंग कंपनी होती.कृष्णा ब्रँड अंतर्गत उत्पादन करणारी कृष्णा इंजिनिअरिंग ही कंपनी खरेदी केलेल्या मशीन्स सुरू करण्यात अयशस्वी झाली.
दुरुस्तीसाठी अभियंत्यांना अनेक वेळा बोलावण्यात आले,परंतु,तरीही मशीन्स सुरू होऊ शकल्या नाहीत. दरम्यान,बँकेने कर्जाची परतफेड करण्याची मागणी सुरू केली.त्यातच,कंपनीने हात वर करून रक्कम परत करण्यास नकार दिला.लागलीच सात नागरिकांनी जिल्हा ग्राहक तक्रार धाव घेत खटला दाखल केला.यात कंपनी दोषी आढळल्याने ग्राहकांच्या बाजूने निकाल लागला आणि कंपनीला व्याजासह रक्कम परत करण्याचा आदेश आयोगाने दिला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!