Wednesday, July 15, 2026
Homeबीडतहसीलदाराचा खतरनाक कारनामा; चिठ्ठीवर लिहिले आकडे अन् म्हणाला 'अजून तीन टाका नं'..

तहसीलदाराचा खतरनाक कारनामा; चिठ्ठीवर लिहिले आकडे अन् म्हणाला ‘अजून तीन टाका नं’..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
बीड :-जिकडे पाहावे तिकडे अनेकजण वरच्या कमाईच्या मागे लागलेले दिसून येतात.त्यातच,काहीजण स्वतःहून पैश्याचे आमिष दाखवतात.तर काहीजण ‘आम्ही कशाला पैसे देऊ,त्यांना पगार कमी पडतो कां? असे म्हणत एखादे शासकीय काम करवून घेण्याचे पैसे देण्याचे टाळतात.मात्र,काम न करता एखादा पक्काच पैसे खाण्यात पटाईत असेल तर त्याची वाट लावण्यात सर्वसामान्य लोकं मागे पुढे पाहत नाही आणि तसेच झाले एका प्रकरणात.महत्वाचे म्हणजे,काही अधिकाऱ्यांनी आपल्या पदाला तरी शोभेल अशी वर्तवणूक करणे आवश्यक आहे.हल्ली राज्यात शासकीय अधिकाऱ्यांच्या लाचेची प्रकरणे गाजत असतांनाच चक्क एका तहसीलदाराचा खतरनाक कारनामा काल शुक्रवारी बीड जिल्ह्यात उघडकीस आला.बीड जिल्ह्याच्या परळी येथील तहसीलदाराने सॉल्वन्सी म्हणजेच ऐपत प्रमाणपत्र देण्यासाठी तडजोडीअंती २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.तीनदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला होता.मात्र,संशय आल्याने तहसीलदाराने लाच स्वीकारली नाही.अश्यातच लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्याने ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.व्यंकटेश मुंडे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तहसीलदाराचे नाव आहे.
विशेष बाब म्हणजे,बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्राप्त होताच पडताळणीवेळी व्यंकटेश मुंडे यांनी चिठ्ठीवर लाचेचे ५०,नंतर २५ असे आकडे लिहून लाच मागितल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान,तक्रारदाराने २० हजार देतो,असे म्हणताच ‘अजून तीन टाका नं’ असे म्हणत २३ हजारांची मागणी केली.यानंतर तीन वेळा लाचलुचपत विभागाने सापळा लावला होता.मात्र,संशय आल्याने मुंडे यांनी लाच स्वीकारली नाही.एसीबीने त्यांच्या जवळील साधारण ८० हजार रुपयांचे दोन मोबाईल जप्त केले.दरम्यान, तहसीलदार मुंडे यांना ताब्यात घेतल्यानंतर एसीबीने त्यांच्या नांदेड येथील यशोविहार भागातील घराची झाडाझडती घेतली.झडती दरम्यान पोलिसांना तब्बल १३ तोळे सोने आणि ५५ हजार रूपये आढळून आल्याने जप्त केले.तहसीलदार व्यंकटेश मुंडे नागरिकांच्या कामांकडे दुर्लक्ष करून येणाऱ्या लक्ष्मीची कामे पटकन करण्यात व्यस्त असायचे.त्यामुळे,सदरची कारवाई होताच तहसील परिसरात उपस्थित ग्रामस्थांनी फटाके फोडत आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बांधकाम कामगारांसाठी मोठा निर्णय; कामगारांना मिळणाऱ्या लाभ रकमेत वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी मोठा आणि महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मंडळाच्या चार प्रमुख कल्याणकारी...

अज्ञात वाहनाची बिबट्याला धडक; बिबट्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला एका भरधाव वेगात असलेल्या अज्ञात वाहनाने जोरात धडक दिल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन  बिबट्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना...

मधमाशी पालन केंद्र योजना; ५० टक्के अनुदानासह मधाला हमीभावाची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करून शेतकरी व युवकांना शाश्वत उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत 'मध...

राज्याच्या विविध भागात पाऊस करणार दमदार एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त :- 'नैसर्गिक आपत्तीस मंडळ जबाबदार राहणार नाही' अश्या म्हणण्याप्रमाणे पावसाचे काही खरे नाही.कुठे मुसळधार पडतो तर कुठे पाण्याचा एक थेंबही पडत नाही.त्यातच...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!