Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोलीट्रॅक्टरला धडक; दोन तरुणांचा मृत्यू ..!

ट्रॅक्टरला धडक; दोन तरुणांचा मृत्यू ..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या कोरची तालुक्यात आज, शनिवारी सायंकाळच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली.एका धावत्या ट्रॅक्टरला ट्रकने मागून जोरदार धडक दिल्याने ट्रॅक्टरचा चेंदामेंदा होऊन दोन तरुणांचा मृत्यू झाला,तर तिघे जखमी झाल्याची घटना कोरची तालुका मुख्यालयापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील कोरची-मोहगाव फाट्याजवळ घडली.अपघातात कैलास कोवे वय ३५ वर्षे रा.मोहगाव/वाकडी,ता.कुरखेडा,जि.गडचिरोली व सागर कल्लो वय २० वर्षे,रा.झेंडेपार,ता.कोरची असे मृत पावलेल्या तरुणांची नावे असून पुरुषोत्तम मडकाम वय ५१ वर्षे रा.चिचोली,ता.अर्जुनी-मोरगाव, जि.गोंदिया,राजेश गंगभोईर वय २८ वर्षे रा.चमरोटोला,ता.मोहल्ला (छत्तीसगड)व प्रदीप नैताम वय २४ वर्षे रा.चीचटोला अशी जखमींची नावे आहेत.यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारार्थ गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
कोरची तालुक्याच्या झेंडेपार गावाजवळ सिमेंट बंधाऱ्याचे काम सुरु असल्याने चांदोना येथून सेंट्रींग घेऊन एमएच ४०-बी ९५७३ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने पाचजण कामावर जात होते.अश्यातच सीजी ०७-बीए ९२८४ क्रमांकाचा ट्रक हा हैदराबाद येथून निघाला व कोरची मार्गाहून रायपूरकडे जाण्यासाठी निघाला होता. दरम्यान,ट्रकने मोहगाव फाट्याजवळ ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली.धडक इतकी जोरदार होती की,ट्रॅक्टरचा चेंदामेंदा तर झालाच,मात्र ट्रॅक्टरखाली मजूर दबल्या गेल्याने एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर एकास रुग्णालयात नेत असतांना वाटेतच मृत्यू झाला.घटनेची माहिती होताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली.माहिती मिळताच बेळगाव पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी दिनेश खटोले, कोरची पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक मुकुंद देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले.जखमींवर डॉ.चेतना सिडाम,डॉ.शिव पुंडे यांनी प्रथमोपचार केले. मात्र,कोरचीच्या ग्रामीण रुग्णालयाची १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका चंद्रपूरला दुरुस्तीसाठी गेल्याने कुरखेडा येथील रुग्णवाहिका बोलावून जखमींना गडचिरोलीला हलविण्यात आले.प्रसंगी ट्रक चालक घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्नात असतांना पोलिसांनी ट्रक चालक अभिषेक शर्मा वय ३० वर्षे, रा.चितवाडा, जि.बालीया,उत्तरप्रदेश यास ट्रकसह ताब्यात घेत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारली ‘जनकल्याणम्’ अभ्यासिका.. – आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील उपक्रमाचे कौतुक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा गावातच उपलब्ध करून देण्यासाठी आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारलेली...

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

शालेय शिक्षण मंत्री गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर.. – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीचा घेणार आढावा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे उद्या,बुधवार ९ सप्टेंबर व १० सप्टेंबर २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून,या दौऱ्यात...

मोबाईल व्यसनातून मुक्तीचा जागर-विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन.. – नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-मोबाईलचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारे व्यसन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या शारीरिक,मानसिक व सामाजिक विकासावर परिणाम करू शकते.या पार्श्वभूमीवर आज,मंगळवार ८...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!