- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम,१९६५ चे कलम १०१(२)प्रमाणे चालू वर्षातील सन २०२५-२६ चे (चार महिन्याचे)सुधारित व पुढील वर्षातील सन २०२६-२७ चे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश चौधरी यांनी तयार केले,तर त्यांचे वतीने लेखापाल अविनाश राठोड यांनी आज,शुक्रवार २० फेब्रुवारीला पार पडलेल्या सभेत वाचुन दाखवले.सदरचे अंदाजपत्रक नगर परिषद स्थायी समितीचे विशेष सभेत १५ जानेवारी २०२६ पर्यंत सादर करावयाचे होते.परंतु नगर परिषदेच्या स्थायी समितीचे गठण हे २० जानेवारी २०२६ ला झाल्यामुळे सदरील अंदाजपत्रक नगर परिषद विशेष सभेसमोर मंजुरी करीता ठेवण्यात आला.
मुख्य अधिकारी यांनी तयार केलेल्या सन २०२५-२६ चे अंदाजपत्रकात सुरुवातीची शिल्लक पकडुन उत्पन्न रुपये १२७,२६,६९,११४/- व खर्च रुपये ११०,२३,४९,९५६/-तसेच सन २०२६-२७ करीता उत्पन्न (सुरुवातीची शिल्लक धरुन)रुपये १६६,१०,१०,१४०/- व खर्च रुपये १६२,५२,३४,७६२/- वजा जाता रुपये ३,५७,७५,३७७/-चे शिल्लकी अंदाजपत्रक मंजुरीकरीता नगर परिषद विशेष सभेसमोर शिफारस केले.
अंदाजपत्रक सादर करतांना मुख्याधिकारी म्हणाले की,शासनाकडून वेळोवेळी आलेल्या निर्देशानुसार नगर परिषदेची आर्थिक स्थिती सुधारण्याकरीता काही नविन कर लावणे व करात वाढ करणे तसेच पाणी पुरवठा, साफसफाई,रस्त्यावरील दिवाबत्ती इत्यादी सारख्या दिल्या जाणाऱ्या सेवा तुटीत असल्यामुळे ही तूट भरुन काढणे आवश्यक आहे.परंतू सन २०२६-२७ वर्षाकरीता कोणत्याही करात कोणतीही वाढ न करता सदरचे अंदाजपत्रकास आजच्या सभेने सर्वानूमते मंजुरी प्रदान केलेली आहे.त्यामुळे देसाईगंज शहराच्या सर्वसामान्य जनतेला एकप्रकारे दिलासा मिळाला आहे.
सदर विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी देसाईगंज नगर परिषदेचे उपाध्यक्ष नरेश विठ्ठलानी,सभापती स्वच्छता, वैद्यक व आरोग्य समिती चैतनदास विधाते,सभापती पाणीपूरवठा व जलनिस्सारण समिती सचिन खरकाटे, सभापती महिला व बालकल्याण भाविआ साधवानी, शिक्षण समिती सभापती बाळकृष्ण माडुरवार,नियोजन समिती सभापती पिंकू बावणे, नगरसेवक तथा गटनेते विकास प्रधान,नगरसेवक श्याम उईके,राहूल सतवानी, विलास लोखंडे,मो.युनुस शेख,नगरसेवीका राधीका पत्रे,मंदा समर्थ,पल्लवी मेंढे, पार्वता बेदरे,गुरमितकौर चावला,आशा दहिवले,लता मुळे,फैमीदा पठाण,ज्योत्सना लुटे,भारती कुथे,स्विकृत नगर सेवक राजेश जेठानी, राजेश रासेकर ईत्यादी सदस्य व नगर परिषदेचे सर्व विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
- देसाईगंज नगर परिषदेचे सन २०२५-२६ या वर्षाचे (चार महिन्याचे)सुधारित व सन २०२६-२७ चे अंदाजपत्रकात खालिल बाबींवर तरतुद करण्यात आली आहे.👇
१. सामान्य प्रशासन -२,४५,६४,०७६/-
२. कर वसुली -५४,३८,०००/-
३. सार्वजनीक सुरक्षितता व अग्नीशमन -७२,०३०००/-
४. रस्त्यावरील दिवाबत्ती -१,६३,९८,०००/-
५. पाणी पुरवठा -२,७८,५०,०००/-
६. पर्यवेक्षण व स्मारक -२२,५०,०००/-
७.साफसफाई व आरोग्य सोयी -१,७१,४२,०००/-
८. रुग्णालये व दवाखाने -१७,०६,१०१/-
९.जन्ममृत्यू विभाग -६,०७,०००/-
१०. सार्वजनिक सभागृह -४,३९,२०००/-
११. सार्वजनिक उद्याने -५,९९,००१/-
१२. विविध बांधकामे -९२,३०,१८९/-
१३. शिक्षण -६,१४,५०,०००/-
१४. ग्रंथालय -२६,६१,०००/-
१५. विविध घटकांकरीता ५ टक्के राखीव निधी-
- दुर्बल घटकांकरीता,
- दिव्यांगांकरीता
- महिला व बालकल्याण
- अनु.जाती व जमाती प्रवर्गाकरीता वरील चार घटकांकरीता प्रत्येकी-६,८५,०६३/-
- Advertisement -

