Friday, September 11, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा येथील माजी सैनिकांच्या पत्नीचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू.. - वाटेतच आला...

कोंढाळा येथील माजी सैनिकांच्या पत्नीचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू.. – वाटेतच आला झटका..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथील माजी सैनिक ज्ञानेश्वर चौधरी यांच्या पत्नी ज्योती चौधरी यांचा वयाच्या ४३ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारच्या रात्री उशिरा घडली.शिवजयंतीचा उत्सव साजरा झाल्यानंतर सदरची घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोंढाळा येथील शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने काल गुरुवारी सायंकाळच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त गावातून महोत्सव रॅली काढण्यात आली.रॅलीत आबालवृद्ध,तरुण-तरुणी,पुरुष-महिला मंडळींनी सहभाग नोंदवून रात्री १० च्या सुमारास मुख्य चौकात प्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यात ज्योती चौधरी यांनीही प्रसादाचा आस्वाद घेतला आणि घरी परतल्या.घरी परतल्यानंतर रात्रीच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागले. प्रकृतीवस्थामुळे कुटुंबीयांनी क्षणाचाही विलंब न करता ज्योती चौधरी यांना चारचाकी वाहनाने देसाईगंज येथील रुग्णालयात नेत असतांनाच रेल्वे क्रॉसिंग जवळ रात्री १२.३५ च्या सुमारास वाटेतच मृत्यू झाला.सहारे हॉस्पिटल येथे दाखल करताच तपासणीअंती डॉक्टरांनी मृत घोषित केल्याने कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले.एका कर्तबगार,शांत,मन-मिळावू स्वभाव असलेल्या ज्योती चौधरी यांच्या अचानकपणे जाण्याची बातमी आज सकाळच्या सुमारास कानावर पडताच गावात स्मशान शांतता पसरली आणि आज,शुक्रवारी शोकाकुल वातावरणात दुपारी १ वाजेच्या सुमारास वैनगंगा नदी तीरावर अंत्यसंस्कार पार पडले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

ऐन सणाच्या दिवशीच दुर्दैवी घटना..! आयशर ट्रक आणि ट्रॅक्सचा भीषण अपघात; आठ जणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-ऐन तान्हा पोळा सणाच्या दिवशीच भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.आज,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास...

माता व नवजात बालिकेचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय पथकाला यश.. – मातामृत्यू कमी करण्यासाठी वेळेवर नोंदणी व उपचार घेण्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील कालीअम्मल हॉस्पिटल येथे अतिजोखमीच्या गर्भधारणेतील अत्यंत गंभीर व गुंतागुंतीच्या प्रकरणात वेळेवर निदान,रक्तघटकांचा पुरवठा,आवश्यक उपचार व तातडीची...

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!