Friday, May 1, 2026
Homeनागपूरग्रामपंचायतींवर सरपंचांनाच प्रशासक नेमण्याच्या हालचालींना वेग..!

ग्रामपंचायतींवर सरपंचांनाच प्रशासक नेमण्याच्या हालचालींना वेग..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :- ग्रामपंचायतींवर प्रशासक राज येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा दिला होता.कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर निवडणुका होईपर्यंत प्रशासक नेमण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने तात्पुरता स्थगित केला होता.शासनाच्या २३ जानेवारीच्या आदेशाला बुलढाणा जिल्ह्यातील ७ सरपंचांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यात सरपंच परिषदेचे राज्य उपाध्यक्ष अरविंद दामोदर दळवी यांच्यासह काही याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेत रिट याचिका क्र.१२५०/२०२६ दाखल केली होती.प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठासमोर झाली.न्यायालयाने राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागासह राज्य निवडणूक आयोगाला नोटीस बजावून त्यांची भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार काल,मंगळवार १७ फेब्रुवारीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल याचिकेवर सुनावणी पार पडली.यात १ जानेवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत कार्यकाळ संपलेल्या आणि प्रशासकीय अडचणींमुळे निवडणुका घेणे शक्य नसलेल्या ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंचांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती करणे राज्य सरकारच्या विचाराधीन असून संबंधित ग्रामपंचायतींचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी प्रशासकाच्या मदतीकरिता प्रशासकीय समितीही स्थापन केली जाईल.प्रशासक व प्रशासकीय समितीचा कार्यकाळ सहा महिन्यांचा राहील. परंतु,निवडणूक प्रक्रिया सहा महिन्यांपूर्वी पूर्ण झाल्यास संबंधित दिवशीच प्रशासक व प्रशासकीय समिती संपुष्टात येईल.त्यामुळे राज्य सरकार आदेशात सुधारणा करून सरपंचानाच प्रशासक म्हणून निर्णय घेण्याचा विचार करीत आहे.दरम्यान,मुख्य सरकारी वकील वरिष्ठ ॲड.देवेंद्र चव्हाण यांनी सरकारच्या संबंधित प्रस्तावाकडे लक्ष वेधून अंतिम निर्णयासाठी वेळ देण्याची मागणी केली.त्यानुसार,न्यायालयाने या प्रकरणावर येत्या, मंगळवार २४ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी निश्चित केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन उत्साहात साजरा.. महाराष्ट्र दिनी “समृद्ध गडचिरोली” घडविण्याचा संकल्प..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा संकल्प व्यक्त करत विकास, शांतता...

‘आदिशा’ प्रकल्पांतर्गत महिला बचत गटातील लाभार्थ्यांना मिळणार दोन टक्के व्याजदराने १ लाख रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महिला बचत गटांना केवळ २ टक्के व्याजदराने फिरता निधी उपलब्ध करून देत गावपातळीवर आर्थिक साखळी निर्माण करणारा ‘आदिशा’ प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!