Wednesday, July 15, 2026
Homeगडचिरोलीविद्यार्थ्यांच्या परीक्षाकाळात वीजपुरवठा खंडित करू नये- आमदार मसराम यांच्या अधिकाऱ्यांना सूचना..

विद्यार्थ्यांच्या परीक्षाकाळात वीजपुरवठा खंडित करू नये- आमदार मसराम यांच्या अधिकाऱ्यांना सूचना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-सध्या बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू असून काही दिवसांत दहावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. अश्यातच गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व त्यांना अभ्यासात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये,यासाठी विशेषतः रात्रीच्या वेळेत वीजपुरवठा खंडित करू नये,अशी सूचना आमदार रामदास मसराम यांनी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना केली.आज,बुधवार ११ फेब्रुवारी रोजी आमदार मसराम हे कोरची तालुक्याच्या दौऱ्यावर होते. प्रसंगी त्यांनी बैठकीच्या माध्यमातून निर्देश दिलेत. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळावा,यासाठी विभागाने योग्य नियोजन करावे,असेही त्यांनी स्पष्ट केले.तसेच पशुवैद्यकीय रुग्णालयात आवश्यक उपकरणे व विविध यंत्रणांची कमतरता असल्याची बाब समोर आल्याने पशुपालकांना उपचारासाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास येताच आमदार रामदास मसराम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने जिल्हा स्तरावर मागणी प्रस्ताव पाठवून आवश्यक उपकरणे व सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात,असे निर्देश दिलेत. पशुपालकांची गैरसोय टाळण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी,असेही त्यांनी स्पष्ट केले.या प्रसंगी कोरची
काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष मनोज अग्रवाल,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन पाटील नाट,धनपाल मिसार,काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष सदरूभाई भामानी उपस्थित होते..
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बांधकाम कामगारांसाठी मोठा निर्णय; कामगारांना मिळणाऱ्या लाभ रकमेत वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी मोठा आणि महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मंडळाच्या चार प्रमुख कल्याणकारी...

अज्ञात वाहनाची बिबट्याला धडक; बिबट्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला एका भरधाव वेगात असलेल्या अज्ञात वाहनाने जोरात धडक दिल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन  बिबट्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना...

मधमाशी पालन केंद्र योजना; ५० टक्के अनुदानासह मधाला हमीभावाची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करून शेतकरी व युवकांना शाश्वत उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत 'मध...

राज्याच्या विविध भागात पाऊस करणार दमदार एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त :- 'नैसर्गिक आपत्तीस मंडळ जबाबदार राहणार नाही' अश्या म्हणण्याप्रमाणे पावसाचे काही खरे नाही.कुठे मुसळधार पडतो तर कुठे पाण्याचा एक थेंबही पडत नाही.त्यातच...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!