Saturday, August 1, 2026
Homeनागपूरदेहव्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या पती-पत्नीस अटक; दोन महिलांची सुटका..

देहव्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या पती-पत्नीस अटक; दोन महिलांची सुटका..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-गरीब तरुणी-महिलांना पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारासाठी प्रवृत्त करणाऱ्या पती- पत्नीचा गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूकविरोधी पथकाने भांडाफोड करून पती-पत्नीस अटक केली आहे.सदरचा अड्डा हा नागपूरच्या पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पंचशील नगर परिसरात सुरू होता.तौफिक नियाज कुरेशी व जोया तौफिक कुरेशी अशी आरोपींची नावे असून हे दोन्ही आरोपी महिलांना ग्राहकांकडे सोडण्यासाठी राणी दुर्गावती चौकातील पेट्रोल पंपाच्या दिशेने जाणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार,पथकाने सापळा रचून पाठलाग केला आणि रस्त्यातच दोघांना अडवले.त्यांच्यासोबत असलेल्या दोन महिलांची चौकशी केली असता आरोपी त्यांना देहव्यापारासाठी ग्राहकांकडे नेत असल्याचे पीडितांनी सांगितले.यानंतर चौघांनाही पाचपावली पोलिस ठाण्यात नेण्यात आले.सुटका करण्यात आलेल्या महिलांना वैद्यकीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठविण्यात आले.प्रकरणी पोलीस तपासात तौफिक हा जोयाचा दुसरा पती असल्याचे निष्पन्न झाले.दोघेही गरीब तरुणी व महिलांच्या आर्थिक अडचणींचा गैरफायदा घेत त्यांच्याकडून देहव्यवसाय करून घेत होते.प्रकरणी आरोपी पती-पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तीन चिमुकल्यांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू; आज दुपारच्या घटनेने हळहळ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील मौजा-खेडेगाव येथे आज,शनिवार १ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास सती नदीत आंघोळीसाठी गेलेल्या चार अल्पवयीन मुलांपैकी...

अखेर पुरात वाहून गेलेल्या ‘त्या’ इसमाचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील मांदेड येथे अतिवृष्टीमुळे दुथडी भरून वाहणाऱ्या नाल्यात पडून एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात असतांनाच अखेर...

युरोप आणि चीन दौऱ्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदेशातील शेतीचा अभ्यास करण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्यात येतात.सन २०२६-२७ साठी राज्य पुरस्कृत या योजनेत युरोप, चीन या...

कर्जमाफी योजनेतील ३ हजार ८१२ शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाने २ जून आणि १५ जुलै २०२६ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’ जाहीर केली आहे.या योजनेच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!