- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-१९ वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप-२०२६ स्पर्धेतील अंतिम सामन्याचा थरार आज, शुक्रवार ६ फेब्रुवारीला भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झिम्बाब्वेची राजधानी हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये रंगणार आहे.विशेष म्हणजे,भारताने आतापर्यंत अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये तब्बल पाच वेळा विश्वविजेतेपद आपल्या नावावर केले आहे.आजच्या अंतिम सामन्याचा विचार केला तर भारतीय संघाने विक्रम नोंदवत तब्बल १० व्यांदा फायनलमध्ये झेप घेतली आहे.अश्यातच आज होणाऱ्या वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपले नाव कोरण्यात कोण यशस्वी ठरणार?याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये नाणेफेक साडेबारा वाजता केली जाईल,तर दुपारी १ वाजता सामना सुरू होईल.भारतीय संघ १० व्यांदा फायनलमध्ये पोहोचला,तर इंग्लंडचा संघ तिसऱ्यांदा फायनल खेळेल,संघाने १९९८ मध्ये एकमेव विजेतेपद पटकावले होते.यापूर्वी २०२२ च्या फायनलमध्ये भारताने इंग्लंडला हरवून पाचव्यांदा ट्रॉफी जिंकली होती.भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ५६ यूथ वनडे सामन्यांमध्ये भारतीय संघाचे वर्चस्व राहिले आहे. तब्बल ४१ सामन्यांमध्ये टीम इंडियाने,तर केवळ १३ सामन्यांमध्ये इंग्लंडने विजय मिळवला.एक सामना बरोबरीत सुटला आणि एक सामना अनिर्णित राहिला.
दोन्ही संघ👇
भारत :-आयुष म्हात्रे(कर्णधार),आरोन जॉर्ज,वैभव सूर्यवंशी,विहान मल्होत्रा,अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), वेदांत त्रिवेदी, आरएस अंब्रिश, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल आणि दीपेश देवेन्द्रन.
इंग्लंड संघ :- थॉमस रेव(कर्णधार),बेन डॉकिन्स, जोसेफ मूर्स,बेन मेयस,कालेब फॉकनर, राल्फी अल्बर्ट, फरहान अहमद,सेबेस्टियन मॉर्गन,जेम्स मीटो, मैनी लुम्सडेन आणि एलेक्स फ्रेंच.
- Advertisement -

