- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-नक्षलविरोधी अभियान राबवित असतांनाच सुरक्षा दलाचे जवान व नक्षलवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले असून घटनास्थळावरून एके-४७ व एसएलआर रायफलसह इतर नक्षली साहित्य जप्त करण्यात आले आहेत.दरम्यान,आज गुरुवारी सायंकाळच्या सुमारास नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सी-६० पथकाचा एक जवान जखमी झाला असून जखमी जवानास उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले आहे.अद्याप जवानांकडून जंगल परिसरात शोधमोहीम राबविण्यात येत असून याबाबत अधिकची माहिती स्पष्ट केली जाणार आहे.सदरची चकमक ही छत्तीसगडच्या नारायणपूर तर महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्हा सीमेवरील घनदाट जंगल परिसरात घडली.
छत्तीसगड तसेच नक्षलवादी संघटनेच्या १० कंपनीच्या उरल्या-सुरल्या नक्षलवाद्यांच्या हालचालींबाबत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती.त्यानुसार, भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबविण्यात आले.नारायणपूर-गडचिरोली सीमेवर व्यापक शोधमोहीम सुरु करण्यात आली.दरम्यान,
काल बुधवारी नक्षलवाद्यांशी काही काळ चकमक उडाली.यात नक्षलवाद्यांचे दोन तळ उद्ध्वस्त करण्यात आले.त्याचवेळेस,घनदाट जंगलाचा फायदा घेत नक्षलवादी पसार झाले.परत आज,गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास अभियान अधिक तीव्र करत अतिरिक्त सी-६० पथक व केंद्रीय राखीव दलाचे क्यूएटीचे एक पथक क्षेत्रात दाखल करण्यात आले.आज सकाळपासून अधूनमधून चकमक सुरु होती.जवानांचा वाढता प्रभाव बघता एका पुरुष नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला असून मृत नक्षलवाद्याची अद्याप ओळख पटलेली नाही.चकमकीत आणखी काही नक्षलवादी ठार झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.याबाबत अधिकृत माहिती गडचिरोली पोलीस दलाकडून जाहीर करण्यात येणार आहे.
- Advertisement -

