Friday, July 17, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआज अंडर-१९ वर्ल्ड कप फायनल; भारत पाच वेळा विश्वविजेता..

आज अंडर-१९ वर्ल्ड कप फायनल; भारत पाच वेळा विश्वविजेता..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-१९ वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप-२०२६ स्पर्धेतील अंतिम सामन्याचा थरार आज, शुक्रवार ६ फेब्रुवारीला भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झिम्बाब्वेची राजधानी हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये रंगणार आहे.विशेष म्हणजे,भारताने आतापर्यंत अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये तब्बल पाच वेळा विश्वविजेतेपद आपल्या नावावर केले आहे.आजच्या अंतिम सामन्याचा विचार केला तर भारतीय संघाने विक्रम नोंदवत तब्बल १० व्यांदा फायनलमध्ये झेप घेतली आहे.अश्यातच आज होणाऱ्या  वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपले नाव कोरण्यात कोण यशस्वी ठरणार?याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये नाणेफेक साडेबारा वाजता केली जाईल,तर दुपारी १ वाजता सामना सुरू होईल.भारतीय संघ १० व्यांदा फायनलमध्ये पोहोचला,तर इंग्लंडचा संघ तिसऱ्यांदा फायनल खेळेल,संघाने १९९८ मध्ये एकमेव विजेतेपद पटकावले होते.यापूर्वी २०२२ च्या फायनलमध्ये भारताने इंग्लंडला हरवून पाचव्यांदा ट्रॉफी जिंकली होती.भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ५६ यूथ वनडे सामन्यांमध्ये भारतीय संघाचे वर्चस्व राहिले आहे. तब्बल ४१ सामन्यांमध्ये टीम इंडियाने,तर केवळ १३ सामन्यांमध्ये इंग्लंडने विजय मिळवला.एक सामना बरोबरीत सुटला आणि एक सामना अनिर्णित राहिला.
दोन्ही संघ👇
भारत :-आयुष म्हात्रे(कर्णधार),आरोन जॉर्ज,वैभव सूर्यवंशी,विहान मल्होत्रा,अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), वेदांत त्रिवेदी, आरएस अंब्रिश, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल आणि दीपेश देवेन्द्रन.
इंग्लंड संघ :- थॉमस रेव(कर्णधार),बेन डॉकिन्स, जोसेफ मूर्स,बेन मेयस,कालेब फॉकनर, राल्फी अल्बर्ट, फरहान अहमद,सेबेस्टियन मॉर्गन,जेम्स मीटो, मैनी लुम्सडेन आणि एलेक्स फ्रेंच.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री; एसटीच्या तिकीट दरात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी बसेसच्या भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. आखाती देशांतील युद्धामुळे इंधनाच्या किंमतीत...

आता राज्यातील रुग्णालयांत इच्छामरणासाठी विशेष वैद्यकीय समित्या होणार स्थापन; शासन निर्णय जारी..

उद्रेक न्युज वृत्त :-जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत गंभीर व्याधीने ग्रस्त आणि दीर्घकाळ बेशुद्धावस्थेत राहते, तेव्हा अशी व्यक्ती स्वतः निर्णय घेऊ शकत नाही.अशा वेळी मरण...

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!