Monday, August 31, 2026
Homeगडचिरोलीनक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी नवे पोलीस मदत केंद्र; २०० कमांडो असणार तैनात..

नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी नवे पोलीस मदत केंद्र; २०० कमांडो असणार तैनात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड उपविभागाअंतर्गत येणाऱ्या व छत्तीसगड राज्याच्या सीमेपासून अवघ्या ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या अतिदुर्गम बिनागुंडा गावात आज,शनिवार २४ जानेवारी रोजी नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली.उपपोलीस स्टेशन लाहेरीपासून १७ किलोमीटर अंतरावर असलेले हे मदत केंद्र दुर्गम भागातील नागरिकांसाठी सुरक्षेचा कणा ठरणार आहे.
तयार करण्यात आलेल्या नवीन पोलीस मदत केंद्रामध्ये पोलीस दलाच्या दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.यामध्ये वायफाय सुविधा,आठ पोर्टा कॅबिन,जनरेटर शेड,आर.ओ. प्लांटद्वारे पिण्याच्या पाण्याची सोय,मोबाईल टॉवर, स्वच्छतागृह सुविधा तसेच सुरक्षेच्या दृष्टीने मॅक वॉल, बी.पी.मोर्चा व सँड मोऱ्यांची उभारणी करण्यात आली आहे.या केंद्राच्या सुरक्षेसाठी गडचिरोली पोलीस दलाचे ४ अधिकारी व ५६ अंमलदार,एसआरपीएफ ग्रुप-१९ कुसळगाव बी कंपनीचे २ प्लाटून, सीआरपीएफ- ९ बटालियन डी कंपनीचे १ असिस्टंट कमांडंट व ७९ जवान तसेच विशेष अभियान पथकाची ८ पथके म्हणजेच २०० कमांडो तैनात करण्यात आले आहेत.
पोलीस मदत केंद्राच्या उभारणी कार्यक्रमादरम्यान परिसरातील नागरिकांसाठी जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पोलीस मदत केंद्र बिनागुंडा हद्दीतील नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.महिलांना साड्या, पुरुषांना धोतर व ब्लँकेट,स्वयंपाकासाठी भांड्यांचा संच,बकेट व मच्छरदाणी देण्यात आली.युवकांना टी-शर्ट,नोटबुक, पेन,शाळेच्या पिशव्या तर लहान मुलांना क्रिकेट बॅट, बॉल,क्रिकेट स्टंप संच,व्हॉलीबॉल नेट व व्हॉलीबॉलचे वाटप करण्यात आले.
सन २०२३ पासून नक्षग्रस्त भागातील सुरक्षा पोकळी कमी करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून राबविण्यात येत असलेल्या साखळीतील हे दहावे पोलीस मदत केंद्र आहे.यापूर्वी ३० जानेवारी २०२५ रोजी नेलगुंडा येथे नवीन पोलीस स्टेशन,९ मार्च २०२५ रोजी कवंडे येथे पोलीस स्टेशन,२३ नोव्हेंबर २०२५ रोजी फुलनार कॅम्प गुंडूरवाही येथे पोलीस मदत केंद्र तसेच १९ डिसेंबर २०२५ रोजी तुमरकोठी येथे पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात आली असून या सर्व उपक्रमांमुळे दुर्गम भागातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!