- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री-लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर महिन्याचे दीड हजार रुपये पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात शासनाच्या वतीने जमा करण्यात आले आहेत.उर्वरित डिसेंबर व जानेवारी महिन्याचे एकत्रित ३ हजार रुपये हे मकर संक्रातीच्या पूर्व संध्येला महिलांच्या खात्यात जमा केले जाणार असल्याचे चित्र असतांनाच महानगर पालिकेची निवडणूक झाल्यानंतर लाडकी बहिण योजनेचे पैसे वितरीत करण्यात यावेत, अशी मागणी काँग्रेसने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.याबाबात आयोगाला तसे पत्र देखील दिले आहे.याच मुद्यावरुन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचा लाडकी बहिणी बद्दल द्वेषाचा क्रूर चेहरा उघड झाल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे.प्रकरणी पत्रावर राज्य निवडणूक आयोगाने याबाबत विचार केला जाईल, असे म्हटल्याने लाडक्या बहिणींच्या खात्यात मकरसंक्रातीनिमित्त जमा होणारे ३ हजार रुपये मिळणार की नाही? वा केव्हा मिळणार? असा पेच निर्माण झाला आहे.
काँग्रेसच्या वतीने दिलेल्या पत्रात म्हटले की,महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना नोव्हेंबर २०२५ ची रक्कम डिसेंबर २०२५ च्या शेवटच्या आठवडय़ात लाभार्थीच्या खात्यात जमा केली.राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी डिसेंबर २०२५ व जानेवारी २०२६ या दोन महिन्यांचे रू.३०००/- एकत्रित देण्याचा घाट सरकारने घातला आहे.ही बाब १ कोटीहून अधिक महिला मतदारांना प्रभावित करेल व निवडणूकीच्या दिवशी मतदान सत्तारूढ पक्षाच्या उमेदवारांना करण्यास प्रवृत्त करणार आहे.एक प्रकारची सामुहिक सरकारी लाच आहे.आदर्श आचारसंहितेचा भंग या सरकारी कृतीने होत आहे.लाडकी बहीण योजनेला आमचा विरोध नाही. डिसेंबर २०२५ व जानेवारी २०२६ चे लाडकी बहीण योजनेचे पैसे निवडणूक संपल्यानंतरच द्यावेत,असे निर्देश आयोगाने शासनास द्यावेत अशी विनंती पत्राद्वारे काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.
- Advertisement -

