Sunday, October 25, 2026
Homeमुंबईकरोडपती बॉलिवूड स्टार स्वतःचे घर असूनही  लाखो रुपयांची भाड्याची रूम कां घेतात?

करोडपती बॉलिवूड स्टार स्वतःचे घर असूनही  लाखो रुपयांची भाड्याची रूम कां घेतात?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई :-  मुंबईमध्ये बॉलिवूड स्टार रॉयल स्टाईलने जगतात पण अभिनेता सलमान खान, ऋतिक रोशन,कार्तिक आर्यन,कृती सेनन आणि अनुपम खेर यांसारखे प्रसिद्ध सेलिब्रटी देखील स्वतःच्या घरात न राहता भाड्याच्या घरात राहतात. सेलिब्रिटी भाड्याच्या घरात राहून महिन्याला लाखो रुपये भाडे भरतात.महिन्याला लाखो रुपये भाडे भरण्यापेक्षा सेलिब्रिटी स्वतःच्या घरात का राहत नाही असा प्रश्न देखील अनेकांना पडतो.

सेलिब्रिटी भाड्याने राहतात यामागे देखील मोठे कारण आहे.सेलिब्रिटी महिन्याला लाखो रुपये भाडे भरतात,त्यामध्ये सेलिब्रिटी आरामात वन बीएचके घर घेवूच शकतात.सेलिब्रिटी भाड्याने राहतात म्हणजे त्यांची स्वतःची प्रॉपर्टी नाही असे सर्वांना वाटत असले परंतु असे नाही.सलमान खान,ऋतिक रोशन,अनुपम खेर यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांकडे त्यांची स्वतःची प्रॉपर्टी आहे.

सलमान खान,ऋतिक रोशन,अनुपम खेर हे कलाकार स्वतःचे घर असून देखील महिन्याला जवळपास ५ ते ८ लाख रुपये भाडे भरतात. सेलिब्रिटी भाड्याच्या घरात राहतात कारण, सेलिब्रिटी शुटिंगसाठी वेगवेगळ्या ठिकाणी राहतात म्हणून भाड्याच्या घरात राहण्यासाठी सेलिब्रिटींची पसंती असते.ज्यामुळे त्यांना सेटवर जाण्यासाठी उशीर होत नाही.

स्वतःचे घर खरेदी करण्याशिवाय सेलिब्रिटी वेग-वेगळ्या ठिकाणी पैसे गुंतवतात.ज्यामुळे त्यांना फायदा होतो.जर तेच पैसे सेलिब्रिटी घर खरेदी करण्यात लावतील,तर पुढच्या १० ते २० वर्षांमध्ये त्यांना हवा तसा नफा मिळणार देखील नाही. सेलिब्रिटी मुंबईमध्ये स्वतःचे घर घेतात पण त्या घरात त्यांचे कुटुंब राहतात.एवढेच नाही तर, भाड्याच्या घरात राहत असल्यामुळे त्यांना टॅक्स पासून देखील सवलत मिळते.सोशल मीडियावर कायम सेलिब्रिटींच्या घरांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.सेलिब्रिटी त्यांच्या घराची सजावट महाड्या वस्तूंनी करीत असतात.मुंबईत अनेक नवीन कलाकार आले आणि स्वतःची स्वप्न पूर्ण केली.काहीचे मुंबईमध्ये भव्य घर आहेत तर काही सेलिब्रिटी भाड्याने राहतात.त्यांचे महिन्याचे भाडे लाखोंमध्ये असते.आपल्याला हवे तसे आयु्ष्य जगता यावे म्हणून देखील सेलिब्रिटी भाड्याच्या घरात राहतात.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! भाडेकरूच्या खोलीत आढळल्या लाखोंच्या बनावट नोटा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.चक्क भाडेकरूच्या खोलीत लाखोंच्या बनावट नोटा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पळसगाव जाट येथील शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल शनिवारच्या सायंकाळी...

आज चंद्राच्या लख्ख प्रकाशाची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा..

उद्रेक न्युज वृत्त :-धार्मिक श्रद्धा,कौटुंबिक स्नेह आणि सांस्कृतिक परंपरांचा संगम असलेल्या शरद ऋतूच्या प्रसन्न वातावरणात चंद्राच्या लख्ख प्रकाशाची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा आज,रविवार २५...

सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरणीची मालिका सुरू; किंमती कमी होण्याचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त :-सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.आज,शनिवार २४ ऑक्टोंबर रोजी इंडीयन बुलियन मार्केटनुसार, देशभरात १० ग्रॅम...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!