Tuesday, August 25, 2026
Homeराजस्थानआश्चर्यचकित...! एका मिठा पानची किंमत ३२०० रुपये- खास नवविवाहित नवरदेव, नवरी साठी...

आश्चर्यचकित…! एका मिठा पानची किंमत ३२०० रुपये- खास नवविवाहित नवरदेव, नवरी साठी तयार केले जाते पान

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

राजस्थान :- खाण्याचे पान किंवा विडा ज्याला आपण मसाला पान किंवा मिठा पान म्हणून ओळखतो.त्याची किंमत किती असू शकेल? याचा विचार आपण फारसा करतच नाही.कारण ती पंधरा-वीस रुपयांच्यावर किंवा फारतर पन्नास रुपये असू शकेल,असे आपल्याला वाटते.तथापि, राजस्थानच्या अलवार जिल्ह्यात एक पानाचे दुकान असे आहे की जेथे ३२०० रुपयांचे पान मिळते.अर्थात हे पान नेहमी तयार केले जात नाही किंवा ते ऑफ द काऊंटर मिळत नाही.यासाठी आधी ऑर्डर द्यावी लागते.त्यानंतरच ते करायला घेतले जाते. अलवार शहरात एका पान भांडारात ते मिळते.संपूर्ण भारतात इतके महाग पान कोठेच मिळत नाही,असे बोलले जाते.नवविवाहित नवरा अन् नवरी यांनी एकत्र खाण्याचे हे पान आहे.केवळ त्यांच्यासाठीच ते बनविले जाते,असे या दुकानाचे मालक म्हणतात.

लग्नसराईत या पानाला प्रचंड मागणी असते. दूरदूरच्या शहरांमधून या पानासाठी ऑर्डरी येतात. ते ताज्या अवस्थेत ग्राहकांपर्यंत पोहोचावे म्हणून वातानुकूलित वाहतूक व्यवस्थेद्वारे पाठविले जाते. या पानात कोणते पदार्थ घातले जातात, हे टॉप सिक्रेट आहे. पानाच्या चवीवरून त्याचे काही प्रमाणात अनुमान काढता येते.तथापि,अनेकांनी प्रयत्न करूनही त्यांना असे पान बनविता आलेले नाही,ही वस्तुस्थिती आहे.त्यामुळे हे पान म्हणजे या दुकानाची अनोखी विशेषतः आहे,असे मानले जाते.हे पान केवळ चवीसाठी नव्हे तर त्यातल्या पौष्टिक घटकांसाठीही प्रसिद्ध आहे.या पानामुळे जड अन्नपदार्थांचे पचनही उत्तमरीतीने होते आणि ॲसिडिटी किंवा गॅसेस यांचा त्रास होत नाही.पानात आयुर्वेदिक पदार्थ घातलेले असतात,असे बोलले जाते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना...

धावत्या बसमधून खाली कोसळताच दुसऱ्या बसने चिरडले; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पुण्यातील सिंहगड मार्गावरील माणिकबाग परिसरात आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. खानापूर-स्वारगेट मार्गावरील धावत्या पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!