Sunday, August 2, 2026
Homeनागपूरआयएएस अधिकारी असल्याचा कुठलाही आविर्भाव न बाळगता पंगतीत बसून केले जेवण.

आयएएस अधिकारी असल्याचा कुठलाही आविर्भाव न बाळगता पंगतीत बसून केले जेवण.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-शासकीय कामे वा जनतेची कामे करण्यासाठी एखाद्या मोठ्या पदावर विराजमान झालेली व्यक्ती ही साहेब कधीच नसते.यात आयएएस अधिकारी असो, खासदार असो,आमदार असो वा एसडीएम,तहसीलदार वा इतर हे तुमची-आमची कार्यालयीन तसेच जनतेची कामे करण्यासाठी असून शासकीय अधिकारी,कर्मचारी हे जनतेचे ‘लोकसेवक’ तर आमदार,खासदार हे ‘लोकप्रतिनिधी’ आहेत.आपण त्यांना मान-सन्मान म्हणून ‘साहेब’ वा ‘सर’ म्हणून संबोधत असतो.अश्यातच काहीजण स्वतःला मोठे साहेब समजून घेण्यात धन्यता मानत असतात. मात्र,याला अपवाद आणि आयएएस अधिकारी असल्याचा कुठलाही आविर्भाव मनात न बाळगता नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट देत तेथील विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनाच्या पंगतीत बसून स्वतः जेवण केले व सोबत असलेल्या सहकाऱ्यांनाही जेवायला सांगितले.त्यांच्या या कृतीतून त्यांनी “अधिकारी” नव्हे तर “आपलाच माणूस” ही भावना विद्यार्थ्यांमध्ये व ग्रामस्थांमध्ये निर्माण केली.
तीन दिवसांपूर्वी म्हणजेच ३० डिसेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी नागपूर जिल्ह्याच्या मौदा तालुक्यातील ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ चा आढावा घेतला आणि विविध शाळांना भेटी दिल्या.या भेटीदरम्यान त्यांनी शाळेतील भौतिक सुविधा,शैक्षणिक व डिजिटल साधने, स्वच्छतागृहे,हॅण्डवॉश स्टेशन तसेच मध्यान्ह भोजन योजनेची सखोल पाहणी केली.शाळेच्या परसबागेत पिकविण्यात येणाऱ्या भाजीपाल्याचा माध्यान्ह भोजनात होणारा वापर,स्वयंपाकगृहाची स्वच्छता,भांड्यांची निगा व धान्यसाठ्याची तपासणी केली.दरम्यान,त्यांनी आयएएस असल्याचा कुठलाही आविर्भाव न ठेवता सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी खाली चटईवर टाकलेल्या पंगतीत बसून जेवण केले.यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिलनाथ कलोडे, पंचायत समिती मौदाचे गटविकास अधिकारी डॉ.महेश बेहेकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना दिले जाणारे पिण्याचे पाणी त्यांनी स्वतः पिऊन त्याची गुणवत्ता तपासली.यावेळी शाळेच्या शिक्षिका व केंद्रप्रमुख जुगलकिशोर बोरकर यांनी पंगतीचे वाढण केले.स्वयंपाक करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक करीत महामुनी यांनी मुख्याध्यापिका सुवर्णा ठोंबरे यांच्याकडून चव रजिस्टर तपासून त्यावर चवदार अन्न,असा शेरा लिहून स्वाक्षरी केली.त्यामुळे शाळेतील कर्मचारी व विद्यार्थ्यांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.यानंतर त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,मारोडी येथेही भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.मुख्याध्यापिका माधुरी चौधरी व शिक्षक महेंद्र हेडाऊ यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी हे अधिकार आणि प्रतिष्ठेपेक्षा माणुसकी,साधेपणा आणि संवेदनशीलतेला अधिक महत्त्व देणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात.प्रशासकीय दौऱ्यावर असतांना त्यांच्या लोकाभिमुख कृतीतून त्याचा परिचय येतो.ग्रामीण भागातील लोकांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांना समजून घेत थेट संवाद साधत असतात.हे विशेष.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर लाचखोर विभागीय वन अधिकाऱ्यास चार दिवसांची पोलीस कोठडी..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ३१ जुलै रोजी जशी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली,तशीच...

आज २५० युवक-युवतींनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ; गडचिरोलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभासी संवाद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत माय भारत(MY Bharat)यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'व्यसनमुक्त युवा- विकसित भारत संकल्प अभियान' अंतर्गत आज...

आता राज्यात अंमलात येणार धर्मांतर-विरोधी ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा-२०२६’.. -कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यास सात वर्षापर्यंतच्या कारावासाची तरतूद..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यात अनेक नागरिकांनी स्वतःचा धर्म बदलून दुसऱ्या धर्माचे स्वीकार केल्याचे,तसेच धर्म बदलल्यानंतरही मूळ धर्मातील लाभ घेण्याचा सपाटा चालवल्याचे...

अखेर ‘त्या’ आत्महत्येचे कारण आले समोर.. – दोन सख्ख्या भावांनी धावत्या रेल्वेसमोर उडी घेतल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील माळेगाव  टाऊन परिसरात गुरुवार ३० जुलै २०२६ रोजी दोन सख्ख्या भावांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना सकाळच्या सुमारास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!