- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :- “गेले ते वर्ष,गेला तो काल नवीन आशा अपेक्षा घेऊन आले २०२६ चे नवीन साल” असे म्हणत गुरुवार १ जानेवारी २०२६ रोजी नवीन वर्षास सुरुवात झाली.नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेकांनी मौज-मजा करून तर काहींनी सुख समृद्धीसाठी पूजा अर्चना,तर काहींची अगदी शांत चित्ताने नवी पहाट उजळली.अश्यातच आता नव्या वर्षातील पहिले पौर्णिमेचे उद्या,शनिवार ३ जानेवारी रोजी चंद्रदर्शन घडणार आहे.या दिवशी वर्षातील पहिला सुपरमून असेल.तो इतर पौर्णिमेपेक्षा खूप मोठा असेल.याला ‘वुल्फ मून’ असेही म्हणतात.विशेष म्हणजे,या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ येणार असल्याने तो ‘सुपरमून’ च्या रूपात अवकाशात तळपतांना दिसेल.स्वच्छ आकाश असल्यास संपूर्ण देशभरात हे विहंगम दृश्य दिसेल.हा केवळ २०२६ चा पहिलाच पूर्ण चंद्र नसेल,तर वर्षातील सर्वात मोठा आणि तेजस्वी चंद्र असणार आहे.या दिवशी चंद्र त्याच्या कक्षेतील पृथ्वीपासूनच्या सर्वात जवळच्या बिंदूवर असेल. त्यामुळे तो सामान्य पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा साधारण १४ टक्के मोठा आणि ३० टक्के अधिक तेजस्वी दिसेल.भारतीय प्रमाणवेळेनुसार उद्या,शनिवार ३ जानेवारी रोजी दुपारी ३:३३ वाजता चंद्र पूर्णत्वास पोहोचेल.मात्र,भारतात याचे खरे विलोभनीय रूप सूर्यास्तानंतर, म्हणजेच चंद्रोदयाच्या वेळी पाहायला मिळेल.आज, शुक्रवार आणि उद्या शनिवारी संध्याकाळी चंद्र पूर्व क्षितिजावर नेहमीपेक्षा थोडा खाली दिसेल. यामुळे उगवणारा चंद्र आकाराने मोठा,अधिक सोनेरी आणि पृथ्वीच्या अगदी जवळ असल्यासारखा वाटणार.
भारतात संध्याकाळी सहा ते सातच्या सुमारास हा सुपरमून दिसू लागेल आणि रात्रभर आकाशात प्रकाशमान असेल.स्वच्छ आकाश असल्यास विविध शहरांसह संपूर्ण देशभरात हे विहंगम दृश्य दिसणार आहे.
- Advertisement -

