Wednesday, October 7, 2026
Homeकुरखेडाप्रियकर व पत्नीने मिळून केली पतीची हत्या; कुरखेडा शहरातील घटना..

प्रियकर व पत्नीने मिळून केली पतीची हत्या; कुरखेडा शहरातील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-पतीला सोडून प्रियकराकडे वास्तव्यास राहू लागलेल्या पत्नीला समजावून परत आणण्यासाठी गेलेल्या पतीला प्रियकर व पत्नीने मिळून हत्या केल्याची धक्कादायक घटना कुरखेडा शहरातील राणा प्रताप वॉर्डात काल मंगळवारच्या मध्यरात्री घडली असून प्रकरणी कुरखेडा पोलिसांनी काही तासातच पत्नी व तिच्या प्रियकरास अटक केली आहे.आरोपी पत्नी रेखा उर्फ सोनी डोंगरवार वय २८ वर्षे व तिचा २५ वर्षीय प्रियकर विश्वजित सांगोळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.तर देवानंद सूर्यभान डोंगरवार वय ३२ वर्षे,रा.गेवर्धा,ता. कुरखेडा,जि.गडचिरोली असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे.
माहितीनुसार,कुरखेडा तालुक्याच्या आंधळी येथील रेखा उर्फ सोनी नागोसे हीचा सात वर्षांपूर्वी गेवर्धा येथील देवानंद डोंगरवार याच्याशी आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता.सगळे काही सुरळीत चालले असतांनाच गेवर्धा येथील महामार्ग बांधकाम करणाऱ्या कंपनीत वाहनचालक म्हणून कार्यरत असणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील राजोली येथील विश्वजित सांगोळे नामक युवकाशी रेखाची ओळख झाली.ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.त्यानंतर दोन महिन्यांतच रेखाने घर सोडले. तेव्हापासून रेखा पतीपासून विभक्त होऊन विश्वजित सांगोळे याच्याबरोबर कुरखेडा येथील राणा प्रताप वॉर्डात राहू लागली.व्यथित होऊन देवानंदने रेखाला घरी परत येण्याची अनेकदा विनंती केली.पण तिने नकार दिला. अश्यातच काल मंगळवारच्या रात्री देवानंद हा पत्नीच्या घरी कुरखेडा येथे गेला.रात्री देवानंद,रेखा आणि विश्वजित यांच्यात वाद झाला.वादाचे रूपांतर हाणामारीत गेले.लागलीच रेखा आणि विश्वजित यांनी देवानंदच्या डोक्यावर लोखंडी रॉडने जोरदार प्रहार केला. यात देवानंदचा घटनास्थळीच मृत्यू झाला.घाबरलेल्या विश्वजितने रेखाच्या मदतीने मध्यरात्रीच देवानंदचा मृतदेह दुचाकीवर मांडून सती नदीच्या नवीन पुलाच्या बांधकामस्थळी नेला.तेथे मृतदेह फेकून स्वतःच्याच दुचाकीची तोडफोड केली व संशय येऊ नये म्हणून दोघांनीही अपघात झाल्याचे भासवले.घटनेची माहिती होताच कुरखेडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता रक्ताचे डाग आढळून आले.सदरचे डाग थेट रेखाच्या घरापर्यंत असल्याने पोलिसांना शंका आली आणि काही वेळातच आरोपी रेखा व विश्वजित सांगोळे यांना खुनाच्या गुन्ह्यात मध्यरात्रीच अटक केली.घटनेचा पुढील तपास कुरखेडा पोलीस ठाण्याचे पीआय महेंद्र वाघ यांच्या नेतृत्वात सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी; मुख्यमंत्र्यांनी घेतली अमित शाह यांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  नवी दिल्ली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यात आज,बुधवार ७ ऑक्टोंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.या भेटीत...

नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटक साहित्ये जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीच्या महाराष्ट्र व छत्तीसगडच्या नारायणपूर सीमेलगत असलेल्या भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटक साहित्ये गडचिरोली पोलिसांनी...

पोलीस उपनिरीक्षकाने राहत्या घरीच संपवले जीवन..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-एका पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या राहत्या घरी बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.निलेश भाऊसाहेब पाटील वय ५५ वर्षे असे मृत पोलिस उपनिरीक्षकाचे नाव...

आता तालुकास्तरावरच मिळणार तात्पुरते फटाका सेंटरचे परवाने..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात फटाके विक्रीचा परवाना मिळवण्यासाठी आता व्यावसायिकांना जिल्हा मुख्यालयात येण्याची गरज भासणार नाही.अर्जदारांची गैरसोय आणि वेळेचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!