Thursday, September 3, 2026
Homeगोंदियाघोटाळेबाजांचा धान बोनसवर डल्ला; तीन धान खरेदी संस्थेच्या २८ संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा..

घोटाळेबाजांचा धान बोनसवर डल्ला; तीन धान खरेदी संस्थेच्या २८ संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यात धान बोनस घोटाळा उघडकीस येताच अनेकजण अवाक् झालेत.चोर धंदे करणारे कुठे-कुठे हात साफ करून घेतील,याचा नेम नाही.विशेष म्हणजे,काही धान खरेदी केंद्रे धान खरेदी-विक्रीच्या माध्यमातून घोटाळे करायचे,मात्र आता चक्क शेतकऱ्यांना मिळणाऱ्या बोनसच्या रकमेवरही डल्ला मारू लागल्याने अश्यांना काय म्हणावे?शासनाकडून दरवर्षी खरीप हंगामात धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहान अनुदान म्हणून प्रति हेक्टरप्रमाणे बोनस जाहीर केला जातो.यासाठी बीम पोर्टलवर आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी करणे आवश्यक आहे.मात्र, सालेकसा तालुक्यातील तीन धान खरेदी संस्थांनी बोगस शेतकरी,दुसऱ्या शेतकऱ्याचे सातबारा क्रमांक व नमुना आठ अ  जोडून,तसेच अकृषक जमिनी कृषक दाखवून त्यावर  बोनसचा लाभ मिळवून दिल्याचे चौकशीत स्पष्ट होताच सालेकसा तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक सतीश मदन डोंगरे यांच्या लेखी तक्रार व सादर चौकशी अहवालावरून बुधवारी सालेकसा पोलिस स्टेशन येथे कलम ३१८ (४),३१६(२),३३६ (३),३४०(२), ३ (५)भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल केला. महत्वाचे म्हणजे,तिन्ही संस्थांचे पदाधिकारी व संचालक मंडळ असे एकूण २८ आरोपींनी शासनाची १ कोटी १३ लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक केली आहे.
सालेकसा तालुक्यातील मानव बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित रामाटोला पांढरी र.जि.१११० केंद्र पाड्डुडदौना संस्थेचे पदाधिकारी व संचालक मंडळातील कैलास रामकुमार अग्रवाल,विनोद रामस्वरूप अग्रवाल, रूपचंद अनंतराम मोहारे, रमेशकुमार रामकुमार अग्रवाल, लोकनाथ लक्ष्मण पटले,रमेशकुमार राकडुजी अंबादे, कमलादेवी रामकुमार अग्रवाल यांनी संगनमत करून सरकारी गटाची नोंदणी,अकृषक गटाची नोंदणी व मूळ शेतकऱ्याच्या गटांची नोंदणी ही दुसऱ्या शेतकऱ्यांच्या नावाने नोंदविणे,मूळ शेतकऱ्यांच्या वारसदाराच्या नावाची नोंदणी करणे व अशा प्रकारच्या जमिनीची नोंदणी करून तिसऱ्याच्या खात्यावर प्रोत्साहनपर रक्कम ६३ लाख ७५ हजार २०० रुपयांची उचल करून शासनाची फसवणूक केली.
तर सालेकसा सहकारी भात गिरणी संस्था मर्या, सालेकसा र.जि.११३ केंद्र कोटजभोरा संस्थेचे पदाधिकारी व संचालक मंडळातील बाबूलाल नत्थुजी उपराडे,मनोज दसाराम इडपाते,मारोतराव दसाराम मेंढे,गुमानसिंग हनुमानसिंग उपराडे,जग्गनाथसिंह कन्हईसिंह परिहार,गादीप्रसाद धनलाल भगत, सावलराम नारायण बहेकार,डिगीराम बक्षी मेश्राम,सुलोचना ऋषीलाल लिल्हारे, कलाबाई संगमलाल खजुरीया यांनीसुद्धा अशा प्रकारे नोंदणी करुन ३० लाख ५६ हजार ६०० रुपयांची उचल करून शासनाची फसवणूक केली.
तसेच कावेरी शेती साधनसामग्री सहकारी संस्था मर्या. बाम्हणी र.जि.१०९७ केंद्र गिरोला संस्थेचे पदाधिकारी व संचालक मंडळातील लक्ष्मण किसनलाल नागपुरे, लिखीराम बालू दमाहे,सुखदास मुलचंद उपराडे, भोलेश्वर छोटेलाल नागपुरे,दालचंद श्रीचंद मोहारे, उमाप्रसाद कुसनलाल गौतम,अमृतलाल सेवादास लिल्हारे,भरतलाल नागपुरे,देवकीबाई लक्ष्मण नागपुरे, ऊर्मिलाबाई लिखीराम दमाहे,तुरसाबाई सुखदास उपराडे यांनी संगनमत करून वरील प्रकारे प्रोत्साहनपर राशी १९ लाख ५५ हजार २०० रुपयांची उचल करून शासनाची फसवणूक केली आहे.या तिन्ही संस्थांचे पदाधिकारी व संचालक मंडळातील आरोपींनी तब्बल १ कोटी १३ लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!