Tuesday, July 21, 2026
Homeगडचिरोलीयुवकांना उद्योजकतेकडे प्रेरित करण्यासाठी सुरु होणार अमृत कौशल्य-उद्यम विकास प्रशिक्षण कार्यक्रम..

युवकांना उद्योजकतेकडे प्रेरित करण्यासाठी सुरु होणार अमृत कौशल्य-उद्यम विकास प्रशिक्षण कार्यक्रम..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-युवकांना उद्योजकतेकडे प्रेरित करण्यासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधिनी(अमृत)या संस्थेला आता गोंडवाना विद्यापीठाचे संस्थात्मक सहकार्य मिळणार आहे.उद्योजकता विकास,कौशल्य प्रशिक्षण आणि स्थानिक उद्योगांतील संधींसंदर्भात दोन्ही संस्था संयुक्तपणे विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविणार असल्याचा निर्णय अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी आणि गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांच्या बैठकीत घेण्यात आला.
विदर्भ दौऱ्यावर असलेल्या विजय जोशी यांनी दीड तासांच्या चर्चेत अमृतची कार्यपद्धती,खुल्या गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली.येत्या पंधरा दिवसांत अमृत कौशल्य उद्यम प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत विद्यापीठाच्या सहकार्याने काही प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याचे निश्चित झाले.या बैठकीस अमृतचे विभागीय उपव्यवस्थापक विक्रम पांडे,तसेच गडचिरोली जिल्ह्यातील अमृतचे अधिकारी विजय चौधरी,गौरव दुपल्लीवार आणि वेदांत मेहता उपस्थित होते.
स्थानिक उद्योग-गुंतवणूक लक्षात घेऊन प्रशिक्षणाचे नियोजन👇
 
गडचिरोली जिल्ह्यात स्टील उद्योगांसह विविध मोठ्या कंपन्यांची हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक होत असल्याने पुढील काळात तांत्रिक कौशल्य असलेल्या युवकांची मोठ्या प्रमाणावर गरज भासणार आहे.या संधींचा लाभ अमृतच्या लक्षित गटातील लाभार्थ्यांना व्हावा,यासाठी तांत्रिक प्रशिक्षण,वाहतूक क्षेत्रातील कौशल्यविकास आणि उद्योगांना आवश्यक असलेल्या ॲक्सेसरीजच्या पुरवठ्यासंबंधी प्रशिक्षण देण्याबाबतही सविस्तर चर्चा झाली आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या आर्थिक मदतीसाठी अमृतची व्याज परतावा योजना सुद्धा उपलब्ध आहे. याचा नवउद्योजकांना तसेच गृह उद्योजकांना उद्योग वाढीसाठी अमृतच्या विविध योजनांचा एकत्रितपणे  चांगला फायदा होऊ शकतो.
विद्यापीठातील बांबू उपक्रमाला अमृतचे प्रशिक्षणास पाठबळ👇
 
गोंडवाना विद्यापीठात बांबूच्या प्रक्रिया,उत्पादन आणि मूल्यवर्धनाशी संबंधित अनेक उपक्रम राबवले जात असल्याची माहिती कुलगुरूंनी दिली.विद्यार्थ्यांनी बांबूपासून पेन,बुक कव्हर,चष्मा,चष्मा कव्हर, गुलदस्ते,कपडे अशा अपारंपरिक वस्तूंची निर्मिती केली असून काही उत्पादने विक्रीसही ठेवण्यात आली आहेत.ही माहिती मिळताच अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी बांबू प्रशिक्षण कार्यक्रम अमृत कौशल्य विकास उपक्रमात समाविष्ट करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.अमृत कौशल्य उद्यम प्रशिक्षणाअंतर्गत या बांबू उद्योगाचा लगेच समावेश करण्यात येईल,असे स्पष्ट केले.विद्यापीठात उपलब्ध असलेली कार्यशाळा,प्रयोगशाळा व उपकरणे अमृतच्या प्रशिक्षण कार्यक्रमांना मोठी मदत ठरतील,असे सांगून कुलगुरूंनी सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही दिली.
गडचिरोलीत नवउद्योजकतेला मिळणार गती👇
जिल्ह्यात उभ्या राहत असलेल्या उद्योगसाखळी,सेवा क्षेत्र आणि पुरवठा साखळीच्या संधींचा लाभ स्थानिक युवकांना देण्यासाठी दोन्ही संस्था आता समन्वयाने काम करणार आहेत.उद्योजकता विकास, कौशल्यविषयक प्रशिक्षण आणि बाजारातील संधी यांचा फायदा खुल्या गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांना मिळावा,हा अमृतचा उद्देश असल्याची माहिती विजय जोशी यांनी यावेळी दिली.अमृतच्या विविध योजनांच्या माहितीसाठी आणि नवनवीन उपक्रमासाठी जिल्हा व्यवस्थापक विक्रम पांडे( 9834323727),जिल्हा उपव्यवस्थापक गौरव दुपल्लीवार (912226527) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन विजय जोशी यांनी केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मन सुन्न करणारी घटना..! जन्मदातीने दहा महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला अन् मृतदेह खांद्यावर घेऊन पोहचली ठाण्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-सोलापूर जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना आज सोमवारी सर्वत्र उघडकीस आली. एका २६ वर्षीय जनमदात्या आईने स्वतःच्या दहा महिन्याच्या पोटच्या लेकीला संपवून...

कोणताही पात्र बांधकाम कामगार योजनांपासून वंचित राहू नये.. -प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर विशेष जनजागृती मोहीम राबवा- आमदार रामदास मसराम

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र,गडचिरोली यांच्या वतीने आज,सोमवार २० जुलै रोजी देसाईगंज पंचायत समिती...

तब्बल ११७ आपले सरकार सेवा केंद्रांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात ११५ ग्रामपंचायत व दोन नगरपरिषद/नगरपंचायत स्तरावरील एकूण ११७ आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी १५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात...

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी उतरले रत्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-देशातील सध्याचे चित्र काही खरे नाही. अनेकजण आपली जबाबदारी व चूक मान्य करण्यास तयारच नाहीत.तुम्ही काहीही करा,आम्हाला कसलाही फरक पडणार नाही....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!