Sunday, June 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तथंडीचा जोर कायम राहणार; काही भागांसाठी 'रेड अलर्ट'..

थंडीचा जोर कायम राहणार; काही भागांसाठी ‘रेड अलर्ट’..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-थंडीचा जोर कायम राहणार असून देशाच्या उत्तरेकडील पर्वतांवर झालेल्या बर्फवृष्टीमुळे आणि पश्चिमी वाऱ्यांच्या प्रवाहामुळे मैदानी भागातील किमान तापमान खाली आले आहे.यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातही थंडीचा जोर वाढला आहे.दिल्ली,उत्तर प्रदेश,पंजाब,हरियाणा आणि राजस्थान या राज्यांत थंडीच्या तीव्र लाटेची शक्यता आहे.यातील काही भागांसाठी ‘रेड अलर्ट’ आहे.भारतीय हवामान विभागानुसार,थंडीच्या लाटेचा परिणाम हा विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अधिक दिसून येत आहे. नागपूर,गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यांत शीत लहरीचा इशारा आहे.नागपूर, गोंदियामध्ये किमान तापमान ९ ते १० अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवले गेले आहे.मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात काही भागांमध्ये पारा १० अंशांच्या खाली उतरला आहे.मुंबईतही तापमानाचा पारा घसरला असून सकाळी आणि संध्याकाळी हलका गारवा जाणवत आहे.पुण्यात किमान तापमान १३ अंश सेल्सिअसच्या आसपास तर नाशिकमध्ये १२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे.राज्यातील तापमानात होणारा  बदल चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यामुळे आणि उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रवाह वाढल्यामुळे आहे. चालू डिसेंबर महिन्यात राज्यात थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर दोघांचा बळी घेणारी नरभक्षक वाघिण जेरबंद..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात दोघांचा बळी घेणारी व दोघांना जखमी करणारी टी-२७ नरभक्षक वाघीण जेरबंद करण्यास वनविभागास यश आले आहे.आज,रविवार २८...

गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल ७७ हजार ६६६ चिमुकल्यांना पोलिओचा डोस..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात आज रविवारी राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय 'पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला' नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या मोहिमेत पहिल्याच...

भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-भरधाव वेगात असलेली अनियंत्रित वॅगनर कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरच्या मागील बाजूस जोरदार धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील...

इसमाची गळफास घेऊन आत्महत्या; आरमोरी शहरातील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी शहरात एका ६५ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज, रविवार २८ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!