Tuesday, September 1, 2026
Homeचंद्रपूररूळ ओलांडताना मालगाडीची धडक; वाघीण जागीच ठार..

रूळ ओलांडताना मालगाडीची धडक; वाघीण जागीच ठार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-रेल्वेच्या धडकेत वन्यप्राण्यांच्या मृत्यूचे  प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.यावर ठोस उपाययोजना करण्यात शासन निष्फळ ठरत असल्याने वन्यप्रेमींकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.अश्यातच रूळ ओलांडताना मालगाडीची धडक बसल्याने एका वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना बल्लारशहा-सिकंदराबाद डाऊन रेल्वे मार्गावरूळ राजुरा तालुक्याच्या चनाखा रेल्वे रुळाजवळ घडली.सदरची बाब काल रविवारी सकाळच्या सुमारास उघडकीस येताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकारी तसेच वन विभागास माहिती दिली.त्यानुसार,राजुराचे उपविभागीय वनाधिकारी एम.डी.गिरडकर,राजुराचे वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन इंगळे यांनी घटनास्थळी दाखल होत चौकशी केली.शनिवारच्या रात्री विहिरगाव नियत क्षेत्रातील चनाखा उप क्षेत्राच्या कक्ष क्रमांक-१६० परिसराला लागून असलेल्या रेल्वे रुळावरून मालगाडी जात असतांना एक वाघीण रूळ ओलांडतांना तीला रेल्वेने जोरदार धडक दिली.त्यात ती जागीच ठार होऊन वाघीण रेल्वे रूळाचे उजव्या बाजुला पडल्याचे दिसून आले.प्रकरणी वनाधिकाऱ्यांनी पंचनामा करून  वाघीणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चंद्रपूर येथे पाठविला.मृत वाघीण ही सात वर्षाची होती. पंचनाम्यादरम्यान वाघिणीचे दात व सर्व अवयव शाबूत असल्याचे वनाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!