Thursday, September 10, 2026
Homeगडचिरोलीकापूस व धान खरेदी नोंदणीची माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा- जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

कापूस व धान खरेदी नोंदणीची माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा- जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-शेतकऱ्यांना खरेदी हंगामात कोणतीही अडचण येऊ नये,नोंदणी प्रक्रिया सर्वांपर्यंत पोहोचावी व पारदर्शक कारभार राखला जावा यावर भर देत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कापूस व धान खरेदी नोंदणीसंबंधीची संपूर्ण माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे,यासाठी व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना बाजार समिती प्रशासनाला दिल्या.जिल्हाधिकारी पंडा यांनी आज बुधवारी चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन कापूस व धान खरेदी प्रक्रियेचा प्रत्यक्ष आढावा घेतला.उपविभागीय अधिकारी एम.अरुण,जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार,तहसीलदार प्रशांत घोरूडे, गटविकास अधिकारी माधुरी येरमे,कृषी उत्पन्न बाजार समिती द महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे संचालक अतुल गण्यारपवार, उपसभापती प्रेमानंद मल्लिक यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी यावेळी बाजार परिसराची सविस्तर पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांना खरेदी केंद्रांवर कोणतीही अडचण येऊ नये, नोंदणीपासून दररोजच्या लिलावापर्यंत सर्व प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक असावी,खरेदी हंगाम निकडचा असल्याने शेतकरी केंद्रावर दाखल होताच त्यांना स्पष्ट मार्गदर्शन,नोंदणी सहाय्य व तात्काळ सेवा देण्याच्या सूचना दिल्या.
बाजार समितीचे संचालक अतुल गण्यारपवार यांनी कापूस खरेदी नोंदणीसाठी बाजार समितीमार्फत शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जात असल्याचे व प्रसारमाध्यमांद्वारे खरेदीसंबंधीची माहिती व्यापक पातळीवर प्रसारित करण्यात येत असल्याचे सांगितले. आधारभूत खरेदी केंद्रावर ताडपत्री,इलेक्ट्रिक वजन काटे,मोइस्चर मीटर,पाण्याची व्यवस्था तसेच शेतकऱ्यांसाठी लिलाव गृह,गोदाम,अडत गाळे, शौचालय,पिण्याचे पाणी आणि राहण्याची सोय बाजार समितीकडून उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे माहिती त्यांनी दिली.जिल्हाधिकारी यांनी अनखोडा येथील आस्था जिनिग प्रोसेसिंग येथे व येणापूर आधारभूत धान खरेदी केंद्रावरही भेट दिली.यावेळी कृषि उत्पन्न बाजार समिती तसेच सहकार व पणन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!