Sunday, July 12, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तचकमकीत कुख्यात नक्षलवादी नेता आणि त्याच्या पत्नीचा खात्मा..!

चकमकीत कुख्यात नक्षलवादी नेता आणि त्याच्या पत्नीचा खात्मा..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत कुख्यात नक्षलवादी नेता मदवी हिडमा त्याचबरोबर हिडमाची पत्नी देखील चकमकीत मारली गेली आहे.छत्तीसगड सीमेवर आज,मंगळवार १८ नोव्हेंबरच्या सकाळपासून दोन वेगवेगळ्या ठिकाणी चकमकी सुरू असून पहिली चकमक छत्तीसगड-आंध्र प्रदेश सीमेवर,तर दुसरी चकमक सुकमा जिल्ह्याच्या एराबोर पोलिस स्टेशन हद्दीतील परिसरात सुरू आहे. छत्तीसगड-आंध्र प्रदेश सीमेवर झालेल्या चकमकीत सहा नक्षलवादी मारले गेले.या चकमकीत हिडमा मारला गेल्याचेही म्हटले जात आहे. तथापि,अद्याप याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.आज सकाळी झालेल्या गोळीबारात अनेक नक्षलवादी जखमी झाले आहेत. सुरक्षा दल अजूनही घटनास्थळी उपस्थित असून परिसरात शोध मोहीम सुरू आहे.सुकमा येथील पूर्ववर्ती गावातील रहिवासी असलेला कुख्यात नक्षलवादी नेता मदवी हिडमा याचेवर १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर होते.तो लहानपणापासूनच नक्षलवादी संघटनेत सामील झाला होता.प्रथम क्षेत्र समितीमध्ये डीव्हीसीएम (विभागीय समिती सदस्य)आणि नंतर डीकेझेडसी (दंडकारण्य विशेष क्षेत्रीय समिती)कॅडरमध्ये सामील झाला.तो नक्षलवाद्यांच्या बटालियन क्रमांक एकचा कमांडरही होता.टेकलगुडेममध्ये पोलिसांवर हल्ला करण्यात आला,ज्यात २१ सैनिक शहीद झाले होते.यात त्याचा सक्रिय सहभाग होता.तो इतर अनेक नक्षलवादी घटनांचा सूत्रधार आहे.एराबोर जंगलात मोठ्या संख्येने नक्षलवादी असल्याची माहिती सुरक्षा दलास मिळाली होती.या माहितीच्या आधारे रात्रीच जवानांना घटनास्थळी पाठवण्यात आले.आज सकाळी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली.जेव्हा सैनिक त्या भागात गेले तेव्हा नक्षलवाद्यांनी त्यांना पाहून गोळीबार केला.त्यानंतर सैनिकांनीही प्रत्युत्तर दिले.सध्या शोध मोहीम सुरू असून शोध मोहीम पूर्ण झाल्यानंतरच नक्षलवाद्यांचे किती नुकसान झाले आहे हे स्पष्ट होईल. दोन दिवसांपूर्वी सुकमा येथे झालेल्या चकमकीत १५ लाख रुपयांचे बक्षीस असलेले तीन नक्षलवादी मारले गेले होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-दोन दुचाक्या समोरासमोर एकमेकींना धडकून घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ११ जुलै रोजी सायंकाळी सात...

दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना दणका; निलंबनासह विभागीय चौकशीचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय कार्यालयात वारंवार गैरहजर राहणे,परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे, आढावा बैठकांना अनुपस्थित राहणे,रजेचे अर्ज विहित नमुन्यात व वेळेत सादर न करणे,वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना...

देसाईगंजच्या विहीरगाव(पोटगाव)येथील ‘त्या’ मातेने रुग्णवाहिकेतच दिला गोंडस मुलीला जन्म..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव(पोटगाव)येथील रहिवासी स्वाती चांगदेव नेवारे ह्या माहेरी बाळंतपणासाठी गेल्या असता  आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेद्वारे गोंदियाला रेफर करत असतांनाच काही अंतरावरील मार्गावर...

कुरुडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे शासन स्तरावर प्रलंबित असलेले प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यात येतील,अशी ग्वाही आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!