Sunday, August 30, 2026
Homeनागपूरपुढील पाच वर्षांत होणार आठ वाघांचे स्थलांतरण..

पुढील पाच वर्षांत होणार आठ वाघांचे स्थलांतरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-पर्यावरण,वन व हवामान बदल मंत्रालयाने दिलेल्या मंजुरीनुसार पुढील पाच वर्षांत टप्याटप्याने  आठ वाघांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतर करण्यात येणार आहे.विशेष म्हणजे,पहिल्या टप्प्यात दोन उपप्रौढ वाघिणींची निवड करण्यात असून त्यापैकी एक वाघीण बुधवार १२ नोव्हेंबर २०२५ रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील खडसंगी वनपरिक्षेत्रातून यशस्वीरीत्या पकडण्यात आली होती.तिची आरोग्य तपासणी करून तिला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्यात आले आहे.सदरची मोहीम वनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ला(क्षेत्र संचालक, टीएटीआर)यांच्या नेतृत्वाखाली पार पडली होती.यामध्ये उपसंचालक (बफर)आनंद रेड्डी,मुख्यालय उपवनसंरक्षक सचिन शिंदे,सहाय्यक वनसंरक्षक एस.एस.दुबे व अनिरुद्ध धागे,तसेच परिक्षेत्र वनाधिकारी श्रीमती राऊत व त्यांची चमू,तसेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे परिक्षेत्र वनाधिकारी संग्राम गोडसे व त्यांच्या टीमने यशस्वीरीत्या पार पाडली होती.सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पोहोचल्यावर वाघीणीवर रेडिओ कॉलर बसवून शास्त्रीय निरीक्षण केले जाणार आहे. त्याचबरोबर,पुढील काळात नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्प व चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प तसेच इतर परिसरातून वाघांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात हलविण्यास पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.या ठिकाणाहून टप्याटप्याने वाघांचे स्थलांतरण करण्यात येणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!