Thursday, September 10, 2026
Homeगडचिरोली५ प्रगतशील शेतकऱ्यांची विदेश अभ्यास दौर्‍यासाठी निवड.. -कुरखेडाच्या गुरनोली येथील परशुराम खुणे...

५ प्रगतशील शेतकऱ्यांची विदेश अभ्यास दौर्‍यासाठी निवड.. -कुरखेडाच्या गुरनोली येथील परशुराम खुणे यांची युरोप दौर्‍यासाठी.. -तर देसाईगंजच्या आमगाव येथील विनोद जक्कनवार यांची जपान दौर्‍यासाठी निवड..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-कृषी विभागामार्फत गडचिरोली जिल्ह्यातील पाच प्रगतशील शेतकऱ्यांची विदेश अभ्यास दौर्‍यासाठी निवड करण्यात आली आहे.या शेतकऱ्यांमध्ये दोन महाराष्ट्र राज्य कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी आणि तीन प्रगतशील शेतकरी यांचा समावेश असून या दौर्‍याचा उद्देश परदेशातील प्रगत शेती तंत्रज्ञान, जलसंधारण प्रणाली,सेंद्रिय शेती,तसेच कृषी उत्पादनांच्या मूल्यवर्धनाविषयी प्रत्यक्ष अनुभव मिळवून देणे हा आहे.ही अभ्यास सहल युरोप,इस्राईल,जपान, मलेशिया,व्हिएतनाम आणि फिलिपाईन्स या देशांमध्ये होणार असून,शेतकरी प्रतिनिधी मंडळ त्या देशांतील अत्याधुनिक सिंचन तंत्र,हरितगृह शेती,आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर आणि कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अभ्यास करणार आहे.या दौर्‍यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील गुरनोली येथील परशुराम कोमाजी खुणे,गडचिरोली तालुक्यातील पारडी कुपी येथील चंद्रशेखर रामदास मुरतेली,गडचिरोली शहरातील बाळकृष्ण असुराज टेंभुर्णे आणि अरुण केवळराम हरडे तसेच देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथील विनोद रामचंद्र जक्कनवार या पाच शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे.त्यापैकी परशुराम खुणे, चंद्रशेखर मुरतेली आणि अरुण हरडे यांची युरोप दौर्‍यासाठी,विनोद जक्कनवार यांची जपान दौर्‍यासाठी,तर बाळकृष्ण टेंभुर्णे यांची मलेशिया, व्हिएतनाम आणि फिलिपाईन्स या देशांच्या अभ्यास दौर्‍यासाठी निवड झाली आहे.या निवड प्रक्रियेसाठी कृषी विभागामार्फत जिल्हास्तरावर अर्ज मागविण्यात आले होते.प्राप्त अर्जांपैकी प्रगत शेती करणाऱ्या, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या आणि उत्पादनवाढ व गुणवत्ता सुधारणा साधणाऱ्या शेतकऱ्यांची निवड निश्चित निकषांनुसार करण्यात आली.या पाच शेतकऱ्यांच्या अनुभवाचा लाभ जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनाही होणार आहे.
  • जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,प्रिती हिरळकर👇

गडचिरोली हा शेतीच्या दृष्टीने आव्हानात्मक जिल्हा असला तरी येथील शेतकऱ्यांनी नवकल्पकतेच्या माध्यमातून उत्तम प्रगती साधली आहे.या विदेश दौर्‍यामुळे त्यांना जागतिक शेतीतील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव मिळेल आणि त्या माध्यमातून स्थानिक पातळीवर शेतीत नव्या संधी निर्माण होतील.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!