Thursday, September 10, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तभीषण स्फोटाने हादरली देशाची राजधानी; आठ जणांचा मृत्यू...

भीषण स्फोटाने हादरली देशाची राजधानी; आठ जणांचा मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-देशाची राजधानी दिल्ली एका भीषण स्फोटाने हादरली असल्याची घटना उघडकीस आली आहे.दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यापासून काही मीटर अंतरावर असलेल्या मेट्रो स्थानकाच्या गेट क्रमांक एक जवळ एका उभ्या असलेल्या कारमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना आज,सोमवार १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान घडली असून परिसरात उभी असलेली अनेक वाहने जळून खाक झाली.तर घडलेल्या भीषण स्फोटात ८ जणांचा मृत्यू तर दहाच्यावर नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.मृतांचा तसेच जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून घटना घडताच राष्ट्रीय सुरक्षा दलाची तुकडी,अग्नीशामक दल घटनास्थळी दाखल होत वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि सुरक्षा यंत्रणांनी तपासकार्य सुरु केले आहे. घटनेमुळे दिल्लीत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर,मुंबईसह देशातील इतर भागांमध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.दिल्लीतील स्फोटानंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे,तीन दिवसांपूर्वीच दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई करत इसिसच्या चार दहशतवाद्यांना स्फोटकांसह अटक केली होती.अश्यातच आज भीषण स्फोटाची घटना घडल्याने सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर येत घटनेचा कसून तपास करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!