- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील वाढोणा गाव परिसरातील शेतशिवारात ग्रामस्थांना दोन पिल्लांसह अस्वलाचे दर्शन झाल्याने काहीकाळ गावकरी भयभीत झाले होते.प्रकरणी स्वॉब फाऊंडेशनला माहिती मिळताच वन विभागाच्या पथकासह घटनास्थळी दाखल होत मध्यरात्रीपर्यंत गस्त घालून फटाक्यांच्या आतषबाजीत अस्वल व तिच्या दोन पिल्लांना जंगलाच्या दिशेने वळविण्याचा प्रयत्न केला गेला.अश्यातच परत तीच अस्वल आज नागभिड तालुक्याच्या सावरगाव परिसरातील शेतशिवारात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.अस्वल आपल्या पिल्लांसाठी कुठल्याही क्षणी हल्ला करू शकते,त्यामुळे नागरिकांनी पाठलाग करणे वा तिला हुस्कवण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन स्वॉब फाऊंडेशन तसेच वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.त्यातच पथकाच्या मार्फत मध्यरात्रीपर्यंत गस्त सुरु असून अस्वल गावात येऊ नये, याकरीता तिला जंगलाच्या दिशेने हाकलून लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.
- Advertisement -

