उद्रेक न्युज वृत्त :-सध्या संपूर्ण भारतात विक्रीआधी औषधांची तपासणी करणाऱ्या चार मोठ्या प्रयोगशाळा कार्यरत आहेत.पण,या प्रयोगशाळांवर कामाचा प्रचंड ताण आहे.यामुळे मध्य प्रदेश सरकारने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात औषध तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळांची उभारणी करण्यासाठी नियोजन सुरू केले आहे.लहान मुलांना खोकला झाल्यावर औषध म्हणून दिल्या जाणाऱ्या ‘कोल्ड्रिफ’ कफ सिरपमुळे मध्य प्रदेशमध्ये २४ लहान मुलांचा मृत्यू झाला होता.यातील १८ मुले नागपूरच्या एम्स आणि खासगी रुग्णालयात उपचार घेत होते.कोल्ड्रिफ(Coldrif),रेस्पीफ्रेश टीआर (Respifresh TR)आणि रीलाइफ (Relife).ही औषधे अनुक्रमे स्रिसन फार्मास्युटिकल्स, रेडनेक्स फार्मा,आणि शेप फार्मा यांनी तयार केली होती.तपासात या सिरपच्या काही बॅचमध्ये डायथिलीन ग्लायकॉल(Diethylene Glycol-DEG)हे विषारी रसायन प्रमाणापेक्षा खूप जास्त प्रमाणात आढळले आहे.हे रसायन मूत्रपिंडाचे गंभीर नुकसान,मेंदूवर परिणाम आणि विशेषतः लहान मुलांमध्ये मृत्यूपर्यंत धोका निर्माण करू शकते. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेने(WHO) कंपन्यांनी डिसेंबर २०२४ नंतर तयार केलेल्या सर्व औषधांची काटेकोर तपासणी करावी आणि तपासणी शिवाय कोणतेही औषध बाजारात विकले जाऊ नये याची काळजी घ्यावी,असे म्हटले होते.या घटनेनंतर मध्य प्रदेश सरकारने सावध पवित्रा घेतला आहे.आता विक्रीआधी प्रत्येक औषधाची तपासणी केली जाणार आहे.या तपासणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात औषध तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळांची उभारणी केली जाणार आहे.राज्यात मोठ्या संख्येने प्रयोगशाळा उभारण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने एक प्रस्ताव तयार केला आहे.या अंतर्गत मध्य प्रदेश सरकार केंद्र सरकारच्या सहकार्याने औषध तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळांची उभारणी करणार आहे. प्रयोगशाळांच्या उभारणीसाठी केंद्राकडून मध्य प्रदेश सरकारने २११ कोटी रुपयांची मदत मागितली आहे. उर्वरित निधीची व्यवस्था मध्य प्रदेश सरकार करणार आहे.मध्य प्रदेशमधील प्रत्येक जिल्ह्यात विक्रीआधी औषधांची तपासणी केली जाईल.तज्ज्ञांच्या परवानगी नंतरच संबंधित जिल्ह्यात औषधाच्या विक्रीला परवानगी मिळणार आहे.अश्याच पद्धतीने देशातील इतर राज्यांनी नियोजन केले तर लवकरच देशातील प्रत्येक जिल्ह्यात औषध तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळा सुरू होतील आणि सदोष औषधांच्या विक्रीला आळा घालणे शक्य होईल,अन्यथा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणे सुरूच राहणार आहे.
कफ सिरपच्या सेवनाने २४ लहान मुलांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारचा सावध पवित्रा..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

