- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-कित्येक शहर व विविध परिसराचे झपाट्याने औद्योगिकीकरण व नागरीकरण होत आहे. त्यामुळे शहर व परिसरात रोजगारानिमित्त राहायला येणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.यात काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे नागरिक असू शकतात.वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रत्येक किरायदार (भाडेकरू)यांचे पोलिस व्हेरिफिकेशन अनिवार्य करण्यात आल्याने नागरिकांनी त्यांच्या घरी राहणाऱ्या
किरायदारांची माहिती पोलिस विभागाला देणे गरजेचे झाले आहे.दुसऱ्या राज्यातील,शहर अथवा जिल्ह्यांमधून नोकरी व रोजगारानिमित्त येणारे नागरिक शहरात किरायाचे घर अथवा खोल्या घेऊन राहतात.वाढत्या नागरीकरणामुळे शहरात चोरी,फसवणूक,गैरवर्तन व इतर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे.याचा स्थानिक नागरिकांना त्रास होऊ शकतो.हा त्रास टाळण्यासाठी आपल्या घरी किरायाने राहणारी व्यक्ती चुकीची तर नाही ना,ती व्यक्ती त्याची ओळख तर लपवित नाही ना,याची आपल्याला माहिती असणे अनिवार्य आहे.या पार्श्वभूमीवर किरायदार ठेवतांना त्यांचे पोलिस व्हेरिफिकेशन अनिवार्य आहे. कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता किरायदार ठेवल्यास,भविष्यात उद्भवणाऱ्या घटनांसाठी घरमालकही जबाबदार ठरू शकतात.
गडचिरोली जिल्ह्यात एका किरायदाराणे दागिण्यांसाठी महिलेची केली होती हत्या👇
गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या ५ किलोमिटर अंतरावर असलेल्या नवेगाव येथे रविवार १३ एप्रिल २०२५ रोजी गडचिरोली जिल्हा परिषदेतील ६० वर्षीय सेवानिवृत्त महिला अधिकारी कल्पना उंदिरवाडे यांची डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार करून हत्या केल्याची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली होती.कल्पना उंदिरवाडे या आपल्या मुलासोबत नवेगाव येथील सुयोगनगर येथे राहत होत्या.त्यांच्यासोबत घरकाम करणाऱ्या शांताबाई अंबादास मुळे वय ६०, रा.नवेगाव यासुद्धा राहत होत्या.उंदिरवाडे यांचे राहते घर दुमजली असून,खाली व वरच्या मजल्यावर तीन कौटुंबिक खोल्या आहेत.सर्वात वरच्या मजल्यावर तीन सिंगल रूम असून,त्याठिकाणी शिक्षण घेणाऱ्या मुली राहत आहेत.सर्वच खोल्या किरायाने दिल्या आहेत. अशातच तीन कौटुंबिक खोल्यांपैकी एका खोलीत आरोपी विशाल ईश्वर वाळके वय ४० वर्षे, रा.ता.एटापल्ली,जि.गडचिरोली,त्याची पत्नी व आई किरायाने होते.अशातच विशाल वाळके याच्यावर कर्ज व हात उसनवारी घेतलेले इतरांचे पैसे देणे होते.त्यामुळे त्याने १३ एप्रिल रोजी कल्पना उंदीरवाडे यांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला.चोरी करतांना आरोपी सापडला असता,त्याने कल्पना यांचे डोक्यावर रॉडने प्रहार केला. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.कल्पना उंदीरवाडे यांचा मृत्यू होताच आरोपी विशाल वाळके याने कल्पना यांच्या अंगावरील तीन दागिने घेऊन पसार झाला होता.यांनतर पोलीस तपास पथकांनी साक्षीदार तसेच इतर पुराव्यांच्या मदतीने संशयीतांची यादी तयार केली. त्यात आरोपी विशाल वाळके हिट लिस्टवर होता. लागलीच संशयाची सुई बळावली अन् तो अलगद जाळ्यात अडकला होता.अश्या घटना घडू नयेत, यासाठी तुमच्याकडे किरायाने राहणाऱ्या व्यक्तीची इत्यंभूत माहिती असणे गरजेचे आहे.
प्रत्येक घरमालकाने खालील कागदपत्रांची प्रत जवळच्या पोलिस ठाण्यात जमा करणे आवश्यक आहे.भाडेकरूचा पोलिस व्हेरिफिकेशन रिपोर्ट, आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र,भाडे करारपत्र पोलिस प्रशासनाकडे सादर करणे अनिवार्य आहे.जर कोणत्याही घरमालकाने ही माहिती पोलिसांकडे सादर केली नाही,तर त्यांच्या घरी चोरी किंवा कोणती घटना घालण्यास स्वतः घरमालक जबाबदार असतील. शहरातील कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.त्यामुळे घरमालकांनी जबाबदारीने वागून पोलिस प्रशासनास सहकार्य करणे आवश्यक आहे.
- Advertisement -

