Monday, May 25, 2026
Homeलाखांदूरअन् बिबट्या पडला ६० फूट खोल विहिरीत 

अन् बिबट्या पडला ६० फूट खोल विहिरीत 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

लाखांदूर :- रात्री शिकारीच्या शोधात जंगलातून शेतशिवारात आलेला एक बिबट शेतातील विहिरीत असल्याची घटना ७ मार्चला सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.त्यानंतर वन विभागाच्या पथकाने तातडीने बचावकार्य करून बिबट्याला पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढले.

सरांडी (बु.) येथील रमेश गणपत राऊत या शेतकऱ्याच्या शेतामध्ये ही घटना घडली.घटनेची माहिती मिळताच लाखांदूरचे वन परिक्षेत्र अधिकारी रुपेश गावित यांच्या नेतृत्त्वात वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.विहिरीत पडलेला बिबट जिवंत असल्याची खात्री होताच गावित यांनी साकोलीचे सहायक वन संरक्षक रोशन राठोड यांना माहिती देऊन वन्यजीव बचाव पथकाची मागणी केली.पथकाने घटनास्थळी दाखल होऊन पिंजऱ्याच्या सहाय्याने जवळपास ६० फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढले.लाखांदूर वनविभाग व गोंदिया वन विभागाच्या वन्यजीव बचाव पथकाने ही कामगिरी पार पाडली.क्षेत्र सहायक आय. जी.निर्वाण,ठाणेदार रमाकांत कोकाटे,वनरक्षक जी. डी. हात्ते,आर.ए.मेश्राम,पी.बी.पाटील,डी.एस.झोडे, पोलिस नायक सतीश सिंगनजुडे,मिलिंद बोरकर, डोलीराम भोयर, पोलिस शिपाई जयेश जवंजारकर, दीपक भुरले,वाहनचालक टेकाम, प्रफुल राऊत, वनमजूर नाकाडे,विकास भुते,भास्कर आंबेडारे, दिगांबर शहारे,पुरुषोत्तम शहारे,सर्पमित्र जागेश्वर कांबळे,आकाश तिघरे,नामदेव मेश्राम,शत्रुघ्न वैद्य, एकांश चव्हाण आदींनी बचाव पथकाची कार्य केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याचा बनाव; बालविवाहात सरकारी पाहुण्यांची एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह २० वर्षीय तरुणासोबत लावल्या जात असल्याची माहिती नागपूर जिल्हा बालसंरक्षण कक्षाला प्राप्त होताच पथकाने अल्पवयीन मुलीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!