Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरस्कूलबस मागे घेतांना चिमुकल्याला धडकली; ४ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू..

स्कूलबस मागे घेतांना चिमुकल्याला धडकली; ४ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-स्कूलबस घराजवळ येऊन थांबल्याने मुलीला शाळेत सोडण्यासाठी आई घराबाहेर पडली.तितक्यात ४ वर्षीय चिमुकला आईमागे गेला.आईमागे जात असतांना त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नव्हते.रोडवर येताच चालकाने स्कूलबस मागे घेतल्याने चिमुकल्याला बसची जोरात धडक बसली.धडकेत गंभीर जखमी झालेल्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कळमेश्वर शहरात काल शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली.पार्थ पंकज कांडलकर वय ४ वर्षे,रा.रतन-सावित्री अपार्टमेंट, महाजन लेआउट, नागपूर रिंग रोड,कळमेश्वर असे मृत पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे.पार्थचे वडील शिक्षक असून,आई गृहिणी आहे.त्याची थोरली बहीण गार्गी फेटरी नागपूर ग्रामीण तालुक्याच्या सेंट जोसेफ स्कूलमध्ये इयत्ता तिसरीत शिकते.ती एमएच-४० सीटी-४३९० क्रमांकाच्या स्कूलबसने रोज शाळेत ये-जा करते.ही स्कूलबस पार्थच्या घराजवळच थांबते.स्कूलबस काल शुक्रवारी सकाळच्या सुमारास घराजवळ येताच आई गार्गीला बसपर्यंत सोडून देण्यासाठी पडली आणि नकळत तिच्याच मागे पार्थदेखील धावत गेला.चालक स्कूलबस मागे घेत असतांना पार्थला स्कूलबसची जोरात धडक लागल्याने तो गंभीर जखमी झाला.सदरचा प्रकार लक्षात येताच शेजारील नागरिकाने पार्थला जखमी अवस्थेत कळमेश्वर शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले.तिथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.स्कूलबसच्या धडकेमुळे पार्थच्या डोके आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती.त्याला जखमी अवस्थेत पाहताच आई बेशुद्ध पडली.पोलिसांनी बस व चालकास ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!