Friday, October 16, 2026
Homeदेसाईगंजऔद्योगीक प्रशिक्षण संस्था देसाईगंज येथे क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम बक्षीस वितरण सोहळा...

औद्योगीक प्रशिक्षण संस्था देसाईगंज येथे क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम बक्षीस वितरण सोहळा संपन्न

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणांसोबतच त्यांच्यातील अंतर्गत कला गुणांना वाव मिळावा या दृष्टिकोनातून संस्थास्तरावर विविध खेळांचेआयोजन करण्यात येते.अशाच प्रकारचे आयोजन औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंजच्या वतीने करण्यात आले असून यामध्ये बुद्धीबळ स्पर्धा,क्रिकेट स्पर्धा, व्हॉलीबॉल स्पर्धा,बॅटमिंटन स्पर्धा,दौड स्पर्धा अश्या विविध खेळांचा समावेश करण्यात आला.तसेच आपल्या संस्कृतीची जोपासना म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करुन विविध प्रकारचे गोंडी नृत्याचे सादरीकरण करण्यात आले.तसेच वक्तृत्व स्पर्धेद्वारे आजचा युवक व्यसनाच्या विळख्यात, मोबाईलचे दुष्परिणाम,प्लास्टिक मुक्त भारत अश्या विविध सामाजिक ज्वलंत विषयावर विद्यार्थ्यांनी वक्तृत्व केले.

विविध उद्देश असलेल्या सोहळ्यादरम्यान विद्यार्थ्यांचा उत्साह अविस्मरणीय होता; सदर समारोपीय व बक्षीस वितरण सोहळ्याला अध्यक्ष म्हणून संस्थेचे प्राचार्य सुरेश एस.चौधरी आणि प्रमुख पाहुणे संस्थेचे गट निर्देशक गोतमारे,टी.आर.खोब्रागडे,डी.व्ही.सूर, शिल्पनिर्देशक जाधव मॅडम आणि मुख्यलिपीक जी. आर.वांढरे होते.संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा रासेयो समन्वयक सी.एम.गरमळे यांनी मांडला.

कार्यक्रमाला चंदू समर्थ,आदर्श भोले,कु.क्षमा बोन्द्रे, डी.सी.बोकडे,रवींद्र लोही,बादल घरडे,टी.यु.सोयाम, संदीप पिलारे,लता लाडे,शाहरुख खान,अभय खोब्रागडे,हेमंत मरसकोल्हे,गजानन  ठाकरे,मिलिंद कापगते,वृषभ पटले,राहुल कऱ्हाडे,शोभा प्रधान व संस्थेतील उपस्थित सर्व कर्मचारी वृंद व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश मेश्राम तर आभार प्रदर्शन विष्णू नागमोती यांनी केले.संपूर्ण कार्यक्रम सोहळा संस्थेचे प्राचार्य सुरेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज येथे पार पडला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!