Thursday, September 3, 2026
Homeगोंदियाएक-दोन नाही तर तब्बल १५ दुचाकी चोरटा पोलिसांच्या तावडीत..!

एक-दोन नाही तर तब्बल १५ दुचाकी चोरटा पोलिसांच्या तावडीत..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील कवडी येथून एका मोटारसायकल चोरट्याला आमगाव पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून चोरीच्या एक- दोन नाही तर तब्बल १५ दुचाक्या जप्त केल्या आहेत.प्रकरणी आमगाव तालुक्यातील कवडी गावातील अट्टल चोरटा मिथुन ईश्वरगिरी रिधनार्थी वय २७ वर्षे असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे.त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.गेल्या बऱ्याच दिवांपासून आमगाव तालुक्यातील कवडी,वडद, तिगांव,बघेडा व इतर परिसरातील नागरिकांच्या दुचाक्या चोरीला गेल्या होत्या.आमगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता.अश्यातच शनिवारी दुचाकी चोरणाऱ्या विरोधात आमगाव पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार आमगाव पोलिस ठाण्याचे ठाणेदार तिरुपती राणे यांच्या आदेशाने पोलिस कर्मचारी परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून १५ दुचाक्या चोरट्याने चोरी करून ठेवल्याची माहिती मिळाली.या माहितीच्या आधाराने त्यांनी धाड टाकून आरोपीला अटक करून १५ दुचाक्या जप्त केल्या.याप्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा करण्यात आला आहे.आरोपी सध्या पोलिस कोठडीत असून त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. प्रकरणातील दुसऱ्या आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत. प्रकरणाचा तपास पीएसआय चव्हाण करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!