Monday, July 13, 2026
Homeचंद्रपूरखुन प्रकरणातील दोन आरोपी तब्बल पंधरा दिवसांनी अटकेत.. -अवैध दारू विक्री करणाऱ्या...

खुन प्रकरणातील दोन आरोपी तब्बल पंधरा दिवसांनी अटकेत.. -अवैध दारू विक्री करणाऱ्या तरुणाचा गळा चिरून केला होता खून..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील मोहाळी गावात एका ३५ वर्षीय तरुणाचा अज्ञातांनी गळा चिरून खून केल्याची घटना शुक्रवार १९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली होती.राजू आनंदराव सिडाम रा.मोहाळी,ता.सिंदेवाही,जि.चंद्रपूर याचा राहत्या घरीच खून करण्यात आला होता.तो अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करायचा.घटनेच्या दिवशी मृतक राजू एकटाच घरी होता.घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला होता.उत्तरीय तपासणीत राजूची हत्या गळा चिरून झाल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांपुढे आरोपींचा शोध घेण्यासाठी मोठे आव्हान उभे राहिले होते.पोलिसांनी सर्व बाजूंनी चौकशी केल्यानंतर तब्बल पंधरा दिवसांनी खुनाचा उलगडा करण्यात सिंदेवाही पोलिसांना यश आले असून खुनातील दोन आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये १.महेंद्र भोजराज पारधी वय २६ वर्षे,रा.कलपात्री,ता.गोरेगाव, जि.गोंदिया २.मयूर रामदास वाघमारे वय २४ वर्षे,रा.मोहाळी,ता.सिंदेवाही,जि.चंद्रपूर अशी आरोपींची नावे असून आरोपी महेंद्र पारधी हा मोहाळी या गावी सासुरवाडीमध्ये राहून मिस्त्री काम करायचा तर मयूर वाघमारे महेंद्रचा मित्र होता.
आरोपी महेंद्र पारधी व मयूर वाघमारे दोघेही चांगले मित्र असून दोघांनाही दारूचे व्यसन होते.१८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळच्या सुमारास दोन्ही आरोपी हे मृतक राजू सिडाम याच्या घरी गणपती वर्गणी मागण्यासाठी गेले होते.वर्गणी मागत असतांना आरोपी व मृतक यांच्यात भांडण झाले होते.राजू सिडाम हा दारू पिल्यानंतर खराब शिवीगाळ करायचा,त्या दिवशी त्याने आरोपींना शिवीगाळ केली होती.त्यामुळे शिविगाळीचा त्यांना राग आला होता.राग आल्याने आरोपी महेंद्र पारधी व मयूर वाघमारे हे त्याच दिवशी सायंकाळी ५ ते ५.३० वाजेच्या सुमारास मृतक राजूच्या घरी दारू पिण्यासाठी गेले होते. तिथे दोघांनीही दारू पिली.राजू काहीतरी बोलणार तोच आरोपींनी चाकूने गळ्यावर वार करून राजूचा खून करून पसार झाले होते.दोन्ही आरोपी दोन दिवसांनी गावातून पळून गेले होते. अश्यातच त्यांचा मोबाईलही बंद होता.पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तांत्रिक तपासाद्वारे आरोपी महेंद्र पारधी याच्या मूळगावी कलपात्री येथे जाऊन दोघांनाही अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास सिंदेवाही पोलीस ठाण्याचे एपीआय सतीश मेश्राम करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!