Thursday, September 3, 2026
Homeनागपूरसोनम वांगचुक यांच्या सुटकेसाठी 'आम्ही भारताचे लोक' यांच्यावतीने उद्याला एकदिवसीय धरणे आंदोलन..

सोनम वांगचुक यांच्या सुटकेसाठी ‘आम्ही भारताचे लोक’ यांच्यावतीने उद्याला एकदिवसीय धरणे आंदोलन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-देशात काही खरं नाही.चांगल्या माणसाची किंमतच राहिलेली नाही वाटते.ज्या माणसाने आपल्या ज्ञानाच्या जोरावर देशातच नव्हे तर जगभर ख्याती मिळवून मोठ-मोठे पुरस्कार,नवनवीन संशोधन करून देशाचे नाव कानाकोपऱ्यात अजरामर केले,अश्या प्रसिद्ध पर्यावरणवादी,शिक्षणतज्ज्ञ व शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत(NSA) अटक करून राजस्थानच्या जोधपूर तुरुंगात ठेवण्यात आले आहे. अश्यातच आता सोनम वांगचुक यांची तातडीने निर्दोष सुटका करण्याच्या मागणीसाठी उद्या,मंगळवार ७ ऑक्टोंबर रोजी ‘आम्ही भारताचे लोक’ यांच्यावतीने नागपूरच्या संविधान चौकात दुपारी १२ वाजल्यापासून एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात येणार आहे.यात सोनम वांगचुक यांची  बिनशर्त सुटका करावी,अटक केलेल्या नागरिकांचीही सुटका करावी,लडाखला सहाव्या अनुसूचीमध्ये सामील करण्यात यावे या मागणीचा समावेश असणार आहे.
प्रसिद्ध पर्यावरणवादी,शिक्षणतज्ज्ञ व शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या विरोधात देशभरात संताप व्यक्त केला जात आहे.त्याचे पडसाद नागपुरातही उमटले असून,काल रविवारी नागपुरातील नागरिकांनी शांतिमार्च काढून वांगचूक यांच्या अटकेचा निषेध केला.सोनम वांगचूक हे राष्ट्रीय हिरो असून,त्यांच्यासह अटक करण्यात आलेल्या लडाखच्या नागरिकांची तातडीने सुटका करा, अशी मागणी केली.वांगचुक यांच्या अटकेच्या विरोधात नागपुरातील नागरिकांच्या एका गटाने एकत्र येऊन फ्रेंड्स ऑफ लडाख,फ्रेंड्स ऑफ नागपूरची स्थापना केली.या बॅनर अंतर्गत नागपूरकरांनी काल रविवारी शांतिमार्च काढला. सायंकाळी साडेपाच वाजता व्हेरायटी चौक येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळून या मार्चला सुरुवात झाली.संविधान चौकात या मार्चचा समारोप करण्यात आला.आम्ही लडाखच्या लोकांसोबत एकजुटीने उभे आहोत.सहाव्या अनुसूचीची त्यांची मागणी ही पर्यावरणीय न्याय,सांस्कृतिक जतन आणि आपल्या संविधानाने दिलेल्या लोकशाही अधिकारांची मागणी आहे.सोनम वांगचूक सारख्या शांतताप्रिय आवाजांना अटक करणे अत्यंत चिंताजनक आहे.आम्ही कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचा निषेध करतो आणि सरकारला संवादात सहभागी होण्याचे आणि लडाखी लोकांच्या न्याय्य आकांक्षा पूर्ण करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!