Thursday, September 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसरकारचे कामच लय भारी; ऐन सणासुदीत विद्युत वितरण कंपनीने केली वीज दरवाढ..!

सरकारचे कामच लय भारी; ऐन सणासुदीत विद्युत वितरण कंपनीने केली वीज दरवाढ..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात कधी एसटीच्या तिकीटात दरवाढ,तर कधी गॅस,पेट्रोल,तेल व इतर जीवनावश्यक वापरातील वस्तूंवर आजच दर कमी होऊन काही दिवसांतच दरवाढीचा भडका उडतांना दिसून येतो.अश्यातच आता ऐन सणासुदीच्या तोंडावर विद्युत वितरण कंपनी म्हणजेच महावितरणने वीज दरवाढ जाहीर करत वीज वापरकर्त्या सर्व ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे.विशेष म्हणजे,ऐन सणासुदीच्या काळात करण्यात आलेली वीज दरवाढ  कोणाच्या अखत्यारीत येतेय,कळणाऱ्यांसाठी इशाराच महत्वाचा असतो.महावितरणच्या म्हणण्यानुसार,वीज मागणी वाढल्यामुळे खुल्या बाजारातून(ओपन मार्केट) महाग दराने वीज खरेदी करावी लागली.तसेच,अधिक उत्पादन खर्च असलेल्या युनिट्सचा वापर करावा लागला आणि याच अतिरिक्त खर्चाची भरपाई इंधन समायोजन शुल्काद्वारे केली जाणार आहे.वीज दरवाढीचा फटका सर्व ग्राहकांवर बसेल,विशेषतः घरगुती ग्राहक,उद्योग, व्यापारी आणि शेतकरी.महावितरणने ऑक्टोंबर महिन्याच्या बिलांसाठी वीज दरवाढ जाहीर केली आहे.१ ऑक्टोंबर २०२५ रोजी महावितरणने सप्टेंबर महिन्याच्या वीज वापराबाबत इंधन समायोजन शुल्क आकारण्याचे आदेश दिले आहेत.महावितरणने जुलैपासून वीज दर कमी केल्याचा दावा केला होता.मात्र,ऑगस्टपासून लगेचच इंधन समायोजन शुल्क लादण्यात आले.आता सप्टेंबरसाठी देखील ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.दरवाढीचा तपशील पाहता,१ ते १०० युनिट वापर करणाऱ्या घरगुती ग्राहकांना प्रति युनिट ३५ पैसे जास्त द्यावे लागणार आहे.१०१ ते ३०० युनिट वापरणाऱ्यांना ६५ पैसे,३०१ ते ५०० युनिट वापरणाऱ्यांना ८५ पैसे आणि ५०१ युनिटपेक्षा जास्त वापर करणाऱ्यांना प्रति युनिट ९५ पैसे जास्त बिल भरणे आवश्यक आहे. बीपीएल ग्राहकांसाठी प्रति युनिट १५ पैसे इंधन समायोजन शुल्क लागू राहणार आहे.शेतकऱ्यांना वीज दरात प्रति युनिट ४० पैसे जास्त द्यावे लागणार आहेत. इलेक्ट्रट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशनवरही प्रति युनिट ४५ पैसे अधिक शुल्क लादण्यात आले आहे.मेट्रो आणि मोनोरेलसाठी देखील ४५ पैसे प्रति युनिट अधिक देणे आवश्यक आहे.तसेच उद्योजक आणि व्यापाऱ्यांवर या दरवाढीचा डबल मार पडणार आहे.अलीकडेच राज्य सरकारने ‘कुसुम घटक ब’ निधीसाठी औद्योगिक व व्यापारी वीज दरावर प्रति युनिट ९.९० पैसे कर लादला होता.आता एलटी औद्योगिक कनेक्शनसाठी ४० ते ५० पैसे आणि एचटी औद्योगिक कनेक्शनसाठी ५० पैसे प्रति युनिट इंधन समायोजन शुल्क लादण्यात आले आहे.ऐन सणासुदीच्या काळात दरवाढ करण्यात आल्याने सरकारचे कामच लय भारी असल्याचे दिसून येते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!