Wednesday, September 2, 2026
Homeगडचिरोलीआगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फटाका परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फटाका परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील सर्व इच्छुकांना तात्पुरत्या फटाका साठवणूक व विक्री परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या परवान्याची मुदत पंधरा दिवसांची असून अर्जदारांनी १० ऑक्टोंबर २०२५ पूर्वी जिल्हादंडाधिकारी तथा जील्ह्याधिकारी गडचिरोली यांचे कार्यालयात विहीत नमुन्यातील अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही.जिल्ह्यातील सर्व तात्पुरत्या परवानाधारकांनी नव्याने अर्ज करणे अनिवार्य राहील.संबंधित तहसिलदार तसेच नगर परिषद,नगर पंचायत किंवा ग्रामपंचायत यांनी अर्जदारांच्या विनंतीनुसार नियोजित जागेची सुरक्षिततेच्या दृष्टीने तपासणी करून नाहकरत प्रमाणपत्र द्यावे.तसेच पोलीस अधीक्षक गडचिरोली यांनी नियमांनुसार अर्जदारास चारित्र्य प्रमाणपत्र निर्गमित करणे आवश्यक राहील. अर्जासोबत पोलीस अधीक्षक कार्यालयाचे चारित्र्य प्रमाणपत्र,तहसिलदार कार्यालयाचा अहवाल, स्थानिक स्वराज्य संस्थेचे नाहकरत प्रमाणपत्र, नियोजित जागेचा अभिलेख,अर्जदाराचे आधार कार्ड व दोन पासपोर्ट आकाराचे फोटो जोडणे बंधनकारक आहे.इमारत किंवा जागा स्वतःच्या मालकीची नसल्यास घरमालकाचे संमतीपत्र देखील सादर करावे लागेल.
Explosive Rules,२००८ नुसार फटाक्यांचे दुकान अग्नीप्रतिरोधक साहित्यापासून बांधलेले,बंद आणि सुरक्षित असावे.दुकाने परस्परांपासून किमान तीन मीटर अंतरावर तसेच संरक्षित क्षेत्रापासून किमान पन्नास मीटर अंतरावर असणे आवश्यक आहे.दुकाने समोरासमोर नसावीत.दुकानाच्या परिसरात तेल,गॅस वा खुल्या दिव्यांचा वापर करता येणार नाही,मात्र भिंतीला किंवा छताला बसविलेले विद्युत दिवे वापरता येतील.जिवंत विद्युत तारा उघड्या स्वरूपात नसाव्यात.प्रत्येक दुकानाला स्वतंत्र विद्युत स्विच असावा तसेच सर्व दुकानांसाठी एक मास्टर स्विच असणे बंधनकारक राहील.दुकानाच्या पन्नास मीटरच्या परिसरात आतिषबाजीवर बंदी राहील आणि एका ठिकाणी पन्नासपेक्षा जास्त दुकाने उभारण्यास परवानगी दिली जाणार नाही.अर्जदारांनी सर्व कागदपत्रे आणि अटींची पूर्तता करून वेळेत अर्ज दाखल करावेत,असे आवाहन अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!