नागपूर :- सर्व मानवी भूत परवडले,पण संशयाचा भूत मोठा खतरनाकच म्हणावे लागेल.संशयाचा भूत एकदा कां अंगात संचारला,तर जे न घडणारे तेही घडत असते. अश्याच प्रकारे काही वर्षापूर्वी प्रेमविवाह झालेल्या दाम्पत्यात पतीच्या संशयाच्या वृत्तीमुळे दोघांमध्ये सतत खटके उडायचे.अश्यातच पतीला पत्नीच्या मित्रावर संशय आला आणि त्याने चक्क पत्नीच्या गळ्यावर भरदिवसाच कटरने वार करून गंभीर जखमी केले.तो इतक्यावरच थांबला नाही तर पत्नीच्या मित्रावरही वार करून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना नागपुरातील सदर व सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसाढवळ्या घडल्याने परिसरात एकच खळबळ माजली.४५ वर्षीय भूमेश्वर पिसे रा.हुडकेश्वर,नागपूर असे आरोपीचे नाव असून तो ट्रक ड्रायव्हर व त्याची पत्नी रेणुका नागपूरच्या सदरमधील एका खासगी बँकेत काम करते.रेणुकाची हुडकेश्वर परिसरातील रहिवासी शैलेंद्र मानारकरशी मैत्री आहे.त्यांची केवळ मैत्री असली तरी भूमेश्वरला त्यांच्यावर संशय होता.संशयाने ग्रासलेला भूमेश्वर अनेकदा रेणुकाशी वाद घालायचा.घटनेच्या दिवशी सोमवारी त्याने एका स्टेशनरीच्या दुकानातून कटर घेतले व दुपारी सव्वातीन वाजता तो महिलेच्या बँकेत पोहोचला.त्याने रेणुका हिला तिच्याशी बोलण्यासाठी बँकेच्या पार्किंगमध्ये बोलावले.तिथे त्याने तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली आणि त्याने अचानक हल्ला करत रेणुकाच्या मानेवर कटरने वार केले,ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली.त्यानंतर तो पळून गेला.रेणुकाला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले.तेथून भूमेश्वर सीताबर्डी येथे शैलेंद्रच्या दुकानात पोहोचला.त्याने त्याला बोलण्यासाठी बाहेर बोलविले व झाशी राणी चौकाजवळ त्याच्या मानेवरदेखील कटरने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.शैलेंद्रने हाताने कटरला पकडले.मात्रआरोपीने त्याच्या गालावर व नंतर छातीवर वार केले.यात तो गंभीर जखमी झाला.त्यानंतर तो तेथून पळून गेला.सीताबर्डी व सदर पोलिस ठाण्याच्या पथकाने त्याचा शोध सुरू केला.दरम्यान,आरोपीने हुडकेश्वर पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले.प्रकरणानंतर त्याची पत्नी व शैलेंद्रला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.त्यातच पहिल्यांदा करणी केली अन् आता भूमेश्वर सातत्याने पत्नीच्या प्रकृतीची विचारपूस करत आहे.
पत्नी अन् तिच्या मित्रावर संशयाची सुई; कटरने वार करत पत्नीचा गळाच चिरला..!
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

