Tuesday, July 21, 2026
Homeगोंदियाअखेर पोत्यात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली..

अखेर पोत्यात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :-जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील दशरथटोला(बाम्हणी)परिसरात शुक्रवार १९ सप्टेंबरच्या सायंकाळी सात वाजताच्या सुमारास पोत्यात सडलेले मानवी शरीर आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. प्रकरणी सालेकसा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.देवेंद्र लक्ष्मण नागपुरे वय ३३ वर्षे,रा.पठाणटोला-बाम्हणी हे नहरटोला येथे श्राद्ध भोजन करून परत येत असतांना त्यांना दुकानामागील नहरजवळ दुर्गंधी आल्याने त्यांनी चौकशी केली.धन्नू कुदऱ्या राऊत यांच्या शेताजवळ रस्त्याच्या कडेला एक पोते दिसले.ते उघडून पाहिल्यावर आत मानवी कवटी आणि बाजूला शरीराचे सडलेले अवशेष असल्याचे दिसून आले.बहुतेक हे पोते कुत्र्यांनी ओढून आणल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील चौकशी पोलिस निरीक्षक भूषण बुराडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर मावस्कर यांनी सुरू केली होती.अश्यातच आता पोत्यामध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटलेली आहे.सदरचा मृतदेह शुभम वाहने वय २६ वर्षे,रा.दैतबर्रा, जि.बालाघाट,मध्य प्रदेश याचा असून तो स्पंदना मायक्रो फायनान्स कंपनीत कर्ज वसुलीचे काम करत होता.४ सप्टेंबर रोजी तो वसुलीसाठी सालेकसा येथे आला होता. त्यानंतर तो बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी सालेकसा पोलिस ठाण्यात केली होती.पोलिसांनी तातडीने शुभमच्या कुटुंबीयांना संपर्क साधून याबाबत माहिती दिली.या घटनेचे गांभीर्य  लक्षात घेता,सालेकसा पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.शुभमच्या मृत्यूमागील कारणे आणि त्याचा संबंध त्याच्या कामाशी आहे का?प्रगंगी त्याचा कुणाशी वाद होता का? त्यादिशेने पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळाल तर पेचात पडाल- आमदार रोहित पवार

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत शेतकरी कर्जमाफी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.सरकारकडून नुसत्या तारखा देण्यात येत असल्याने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र...

इंडिया स्किल्स स्पर्धेसाठी नोंदणी सुरू; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य सिद्ध करण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत आयोजित 'इंडिया स्किल्स'(IndiaSkills) आणि 'वर्ल्ड स्किल्स'(WorldSkills) स्पर्धांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून,त्या-त्या जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या...

मन सुन्न करणारी घटना..! जन्मदातीने दहा महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला अन् मृतदेह खांद्यावर घेऊन पोहचली ठाण्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-सोलापूर जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना आज सोमवारी सर्वत्र उघडकीस आली. एका २६ वर्षीय जनमदात्या आईने स्वतःच्या दहा महिन्याच्या पोटच्या लेकीला संपवून...

कोणताही पात्र बांधकाम कामगार योजनांपासून वंचित राहू नये.. -प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर विशेष जनजागृती मोहीम राबवा- आमदार रामदास मसराम

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र,गडचिरोली यांच्या वतीने आज,सोमवार २० जुलै रोजी देसाईगंज पंचायत समिती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!