- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्यातील अतिसंवेदनशील आणि नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धानोरा तालुक्याच्या मुरुमगाव पोलीस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-९३० वरील ठिकठिकाणी असलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढलेले होते.पावसाच्या दिवसात खड्ड्यांमध्ये पाणी साचून ‘खड्डा की रस्ता’ कळत नसल्याने विशेषतः दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागला.तसेच अनेकांना त्रासाला सामोरे जावे लागत होते.प्रसंगी सामाजिक दायित्व अंगिकारत अपघात रोखण्यासाठी मुरुमगाव पोलिसांनी स्तुत्य उपक्रम राबविण्याचे ठरवून जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल व धानोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन ठेंग आणि राहुल चौधरी यांच्या संकल्पनेतून महामार्गावरील खड्डे बुजवून एकप्रकारे सामाजिक बांधिलकी जोपासली.या उपक्रमांतर्गत महामार्गावरील सुमारे १२ किलोमीटर अंतरापर्यंत असलेले ७० ते ८० मोठे खड्डे मुरूम व गिट्टी टाकून बुजवण्यात आले.या कामात महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे गडचिरोली जिल्हा सचिव रोशन कवाडकर, केंद्रीय राखीव पोलीस दल ब्रावो ११३ बटालियनचे अधिकारी एसी शशी भूषण यादव, मुरुमगावचे सरपंच शिवप्रसाद गव्हना,पोलीस भरतीसाठी तयारी करणारे विद्यार्थी,स्थानिक पत्रकार बांधव,तसेच स्थानिक ग्रामस्थ सहभागी झाले.
या श्रमदान उपक्रमाला राहुल भैया दुबाले,संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना आणि गृह विभाग निराकरण समन्वय समिती सदस्य यांच्या मार्गदर्शनाची साथ लाभली.महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे जिल्हा सचिव रोशन कवाडकर यांनी स्थानिक अपघाताला निमंत्रण देणाऱ्या खड्डेमय रस्त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मुरूमगाव मार्गावरील खडे बुजवण्याकरिता जेसीपी,ट्रॅक्टर व पाण्याची सोय करून स्वतः श्रमदान करून मार्ग सुधारणा करण्याचे काम पार पाडले.या महामार्गाचा वापर शैक्षणिक विद्यार्थ्यांसह गरोदर माता तसेच परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर करीत असतात.रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवासात अडथळा निर्माण व्हायचा. पोलीस दलाच्या या उपक्रमाने आता अनेकांचा मार्ग सुकर झाला आहे.परिसरातील नागरिकांनी पोलीस प्रशासन,महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना गडचिरोलीचे पदाधिकारी तथा उपस्थितांचे आभार मानत उपक्रमाचे कौतुक केले.
- Advertisement -

