Wednesday, September 9, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता ईव्हीएम मशिनवर असणार उमेदवारांची रंगीत छायाचित्रे..

आता ईव्हीएम मशिनवर असणार उमेदवारांची रंगीत छायाचित्रे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-निवडणुकीतील मतदान करतेवेळी अनेक मतदार गोंधळून जात असतात.ईव्हीएम मतपत्रिकेवर केवळ अनुक्रमांक,चिन्ह आणि एकाच नावाचे दोन उमदेवार असल्याने पसंतीच्या उमेदवाराला मतदान न होता भलत्याच उमेदवाराला मतदान होत असते.त्यामुळे मतदारांची सोय आणि निवडणूक प्रक्रिया सुधारण्यासाठी गेल्या सहा महिन्यांत राबविण्यात आलेल्या २८ सुधारणांचा एक भाग म्हणून यापुढे आता इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या बॅलेट पेपरवर उमेदवारांची रंगीत छायाचित्रे छापली जाणार आहेत. सदरचा प्रयोग सर्वप्रथम बिहार राज्यामध्ये होत असून नंतर इतर राज्यांमध्येही लागू केला जाणार आहे.विशेष म्हणजे,सध्या स्थितीत बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून अद्याप निवडणुकांच्या तारखा जाहीर व्हायच्या आहेत.ईव्हीएम मतपत्रिकेवर रंगीत छायाचित्रांसह उमेदवारांचे क्रमांक आणि फॉन्ट आकार मोठा असेल,ज्यामुळे मतदारांना ते वाचणे आणि पाहणे सोपे होईल.उमेदवाराचा चेहरा इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या बॅलेट पेपरवरील तीन-चतुर्थांश भागावर असणार आहे.यामुळे मतदारांना उमेदवारांची ओळख पटवणे सोपे होणार आहे. त्याशिवाय क्रमांकालाही आता आधीपेक्षा अधिक महत्त्व दिले जाणार आहे.निवडणूक आयोग बिहार विधानसभा निवडणुकीपासून या उपक्रमाची सुरुवात करणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!