Friday, September 4, 2026
Homeनागपूरकाँग्रेस खासदारांच्या कारचा भीषण अपघात; थोडक्यात बचावले..!

काँग्रेस खासदारांच्या कारचा भीषण अपघात; थोडक्यात बचावले..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-परतीच्या प्रवासावर असतांना काँग्रेसचे भंडारा-गोंदियाचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या फॉर्च्यूनर कारचा आज,गुरुवार ११ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास नागपूरच्या उमरेड बायपास मार्गावर भीषण अपघात झाला.अपघातात पडोळे यांच्यासह अन्य तिघेजण थोडक्यात बचावले.मात्र,पडोळे यांच्या वाहनाच्या समोरील भाग चक्काचूर होऊन मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,नुकतीच उपराष्ट्रपती पदाची निवडणूक दिल्ली येथे पार पडली होती.त्यासाठी खासदार पडोळे दिल्लीला गेले होते.दिल्लीहून नागपूरला ते विमानाने आले होते.त्यामुळे आज पडोळे यांना आणण्यासाठी एमएच ३६ एपी ९९११ क्रमांकाच्या कारने त्यांचे पीए यश पाटील,वाहन चालक राहुल गिऱ्हपुंजे व पडोळे यांचे मित्र गिरीश रहांगडाले असे तिघे नागपूरला गेले होते.पडोळे यांना घेऊन ते नागपूर-भंडारा या राष्ट्रीय महामार्गावरून भंडाऱ्याकडे येत असतांनाच नागपूरच्या उमरेड बायपास मार्गावर एका ट्रकने त्यांच्या कारला जोराची धडक दिली.यात चौघेही किरकोळ जखमी झाले.अपघात घडताच स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!