- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-दररोज क्राइम पेट्रोल मालिका पाहून त्यातील काही कथानक अंगात संचारले आणि आपणही शॉर्ट कट मार्गाने झटपट पैसे कमावण्याची कृती करणाऱ्या एका २८ वर्षीय महिलेचा प्रयत्न फसला.प्रकरणी नागपूरच्या बेलतरोडी पोलिसांनी तीन तासांत आरोपी महिलेचा छडा लावून तिला गजाआड केले.२८ वर्षीय सपना भोजराज जामुनपाने ऊर्फ सपना मयूर मेंढे रा.शिवणगाव पुनर्वसन, नागपूर असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
आरोपी महिला ही टीव्हीवर सतत क्राइम पेट्रोल पहायची.क्राइम पेट्रोल मालिकेत चोरी करण्यासंदर्भाने कथानक नजरेसमोर ठेवून तिने प्रत्यक्ष कृती करण्याचे ठरविले.त्यानुसार ६५ वर्षीय सुमन कृष्णाजी जरोंडे रा.शिवनगाव पुनर्वसन,नागपूर या आपल्या घरासमोर रस्त्यावर फिरत होत्या.तेवढ्यात आरोपी सपना तोंडाला स्कार्फ बांधून त्यांच्याजवळ गेली आणि तिने सुमन यांच्या गळ्याला चाकून लावून गळ्यातील मंगळसूत्र काढून देण्यास सांगितले.घाबरलेल्या सुमन यांनी मंगळसूत्र काढण्याचा प्रयत्न केला,परंतु ते निघाले नसल्याने आरोपी सपनाने मंगळसूत्र हिसकावून तोडले.त्यानंतर सपना घटनास्थळावरून फरार झाली.घाबरलेल्या सुमन यांनी सायंकाळी मुलगा घरी आल्यानंतर आपबीती सांगितली.शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास त्यांनी बेलतरोडी ठाण्यात तक्रार दिली.परंतु,आरोपी तोंडाला स्कार्फ बांधून असल्यामुळे तिचे वर्णनही सुमन यांना सांगता येत नव्हते.त्यामुळे बेलतरोडी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंद कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर कांडुरे,उपनिरीक्षक शिरीष सलगर,रविकांत भदाने,सुकन्या चौधरी,सुनील ढोके यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यास सुरुवात केली.एका ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीत आरोपी महिला आढळली.त्या फुटेजच्या आधारे शोध घेतल्यानंतर आरोपी सपनाला अटक करण्यात आली व तिची तब्बल सहा तास चौकशी केली.चौकशी करूनही ती मी नव्हे,अशी भूमिका घेतली.पोलिसी खाक्या बसताच आरोपी सपनाने अखेर गुन्ह्याची कबुली दिली व टीव्हीवरील क्राईम पेट्रोल मालिका पाहून झटपट पैसे कमावण्यासाठी सदरची कृती केल्याचे तिने पोलिसांना सांगितले.
- Advertisement -

