Friday, September 4, 2026
Homeनागपूरकहाणी मध्ये ट्विस्ट..! 'त्याने' खून करण्यासाठी ऑनलाईन बोलावलेला चाकू होता दुसऱ्यासाठीच..! -...

कहाणी मध्ये ट्विस्ट..! ‘त्याने’ खून करण्यासाठी ऑनलाईन बोलावलेला चाकू होता दुसऱ्यासाठीच..! – अल्पवयीन प्रियकराने १५ वर्षीय प्रेयसीचा खून केल्याचे प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपूरच्या रामबाग परिसरात वास्तव्यास असणारा अल्पवयीन प्रियकर व इयत्ता दहाव्या वर्गात शिक्षण घेणारी कौशल्यायन नगरातील एंजेल जॉन यांचे प्रेमप्रकरण इयत्ता सातव्या वर्गापासून रंगू लागले होते.बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या प्रेमप्रकरणात मागील तीन महिन्यांपासून दुरावा निर्माण झाला होता.त्यामुळे एंजेलने त्याला भेटण्यास तसेच प्रेमसंबंध तोडण्याचा प्रयत्न केला.अश्यातच अंगात सैतान संचारलेल्या प्रियकराने प्रेयसीचा खून केल्याची घटना नागपूरच्या अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बदामी कॉलनी परिसरात असलेल्या सेंट अँथोनी शाळेसमोर भर दुपारी शुक्रवारी २९ ऑगस्ट रोजी घडली होती.एंजेल जॉन वय १५ वर्षे,रा.कौशल्यायन नगर, नागपूर असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती सेंट अँथोनी शाळेमध्ये इयत्ता दहाव्या वर्गात शिकत होती.तर अल्पवयीन आरोपी हा रामबाग परिसरात आई,भाऊ आणि बहिणीसह राहतो.आरोपी केअरटेकर म्हणून काम करतो.त्याचे वडीलही कुख्यात गुन्हेगार असून त्याच्या वडिलांवर चेन स्नॅचिंग,खून आणि हत्येचा प्रयत्न असे अनेक गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी अल्पवयीन प्रियकर हा १७ वर्षे ८ महिन्याचा असून तो १५ वर्षीय प्रेयसीच्या प्रेमात वेडापिसा झाला होता.गेल्या तीन महिन्यांपासून एंजेल माझ्याशी कां बोलत नाही? तिच्या जीवनात दुसरा कुणी तरी आला असावा? त्यामुळे त्याचा काटा काढण्यासाठी त्याने आठ दिवसांपूर्वीच ऑनलाईनवरून चाकू खरेदी केला होता.तशी योजनाही आरोपी प्रियकराने आखली होती.त्यानुसार एंजेलने ज्या मित्राला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती,त्या मित्राची आरोपीने सर्वप्रथम भेट घेत त्याला समजावून सांगितले. ती माझी आहे,तिच्या जीवनात तुझी एंट्री धोकादायक ठरू शकते.फ्रेंड रिक्वेस्ट पाठविलेल्या मित्राने आरोपीला सांगितले की,एंजेलच्या मैत्रीची रिक्वेस्ट केव्हाचाच फेटाळलो आहे,त्यामुळे मनात शंका बाळगू नकोस,असे म्हणताच आरोपी प्रियकराने त्याला सोडून दिले.अन्यथा सर्वप्रथम टार्गेटवर तोच होता.त्यासाठीच आरोपीने ऑनलाईनवरून चाकू खरेदी केला होता.मात्र,प्रेमात कावरा-बावरा झालेल्या आरोपी प्रियकराने इयत्ता सातव्या वर्गापासून सुरू असलेल्या प्रेमाचा शेवट खून करून केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!